Akshaya Tritiya 2022 : घरी बसल्या 1 रुपयात खरेदी करा 24 कॅरेट सोनं; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या कंपनीने सुरू केली नवी सेवा

| Updated on: Apr 30, 2022 | 12:09 PM

यंदा 3 मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. कंपनीची ही ऑफर ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

Akshaya Tritiya 2022 : घरी बसल्या 1 रुपयात खरेदी करा 24 कॅरेट सोनं; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या कंपनीने सुरू केली नवी सेवा
सोनं लागलं भाव खायला !
Image Credit source: tv 9
Follow us on

Akshaya Tritiya 2022 : साडेतीन मुहूर्तांपेकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर तुम्हाला सोने खरेदीची (Gold Buy) सुवर्ण संधी मिळत आहे. देशात दसरा, दिवाळी आणि अक्षय तृतीयेला सोने खरेदीला शुभ मानण्यात येते. भारतीय संस्कृतीत या सणांना अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी सोन्याची केलेली खरेदी ही धन वृद्धी करणारी मानण्यात येते. ऑनलाइन कर्ज पुरवठादार क्रेडिटबीने (KreditBee) अक्षय तृतीयेपूर्वी एक नवीन फीचर लाँच केले आहे. क्रेडिटबीने आज डिजिटल गोल्ड इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट (Digital Gold Investment Product) ‘क्रेडिटबी 24 के गोल्ड’ बाजारात आणण्याची घोषणा केली. क्रेडिटबी अॅपवर (KreditBee App) एका क्लिकवर ग्राहक 99.5% शुद्धतेचे डिजिटल सोने (Digital Gold) थेट बाजार दराने खरेदी करू शकतात. सध्या ही ऑफर निवडक ग्राहकांना उपलब्ध आहे. यामध्ये ते कमीत कमी 1 रुपये आणि जास्तीत जास्त 3 लाख रुपये गुंतवू शकतात. याहून अधिक गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पण कंपनी लवकरच ही सुविधा सुरू करणार आहे. यासाठी कंपनीने सेफगोल्डसोबत भागीदारी केली आहे.

सोन्याला मिळणार होम डिलिव्हरी

सेफगोल्ड (SafeGold) हा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ज्याने एक इकोसिस्टम तयार केली आहे. जी ग्राहकांना सोन्यामध्ये डिजिटल व्यवहार करण्यास सक्षम करते. या भागीदारीअंतर्गत कंपनी ग्राहकाला कमीत कमी 1 रुपयांत सोने खरेदीची संधी देणार आहे आणि त्यांना चोवीस तास सोने खरेदी- विक्री करता येईल. ग्राहकांना झटपट, सुरक्षित आणि रिअल टाइममध्ये सोन्यात गुंतवणूक करता यावी यासाठी क्रेडिटबीने ही सेवा सुरू केली आहे. खरेदी केलेले सोने नाणे किंवा बारमध्ये देखील रूपांतरित केले जाऊ शकते आणि तिजोरीत साठवले जाऊ शकते. जर ग्राहकाला सोन्याची आवश्यकता असेल तर ते देशभरातील त्यांच्या घरी त्याची डिलिव्हरी करण्याची विनंती करू शकतात. या घरपोच येणाऱ्या सोन्याचे प्रमाण किमान 5 ग्रॅम असावे. हे सेफगोल्डकडून विनामूल्य ट्रान्झिट इन्शुरन्सद्वारे सुरक्षित केले जाते.

वैयक्तिक सुरक्षा वॉलेट

डिजिटल गोल्ड तुम्ही ऑनलाईन खरेदी करु शकता. जशी खरेदी करु शकता तसेच ऑनलाईन पद्धतीनेच त्याची विक्री करता येते. डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूकदार 24 कॅरेट शुद्ध सोन्याची खरेदी करतो. हे सोने सुरक्षित ठेवण्यात येते आणि त्याला विम्याचे संरक्षणही असते. डिजिटल सोन्यातील गुंतवणूकही 1 रुपयांपासून सुरू करता येईल. डिजिटल सोने खरेदी केल्यावर, खरेदीदाराला वैयक्तिक सुरक्षा वॉलेट मिळते ज्याचा विमा देखील काढता येतो. विशेष बाब म्हणजे बाजारभावानुसार या डिजिटल सोन्याचे रोखीत अथवा ख-या सोन्यात कधीही परतावा मिळविता येतो. गुगल पेच्या (Google Pay) साहाय्याने तुम्ही डिजिटल सोने (Digital Gold) खरेदी करु शकता. हे सोने 99.99 टक्के शुद्ध म्हजे 24 कॅरेट इतके शुद्ध असल्याचा दावा गुगल पे करते. हे सोने एमएमटीसी-पीएएममार्फत (https://www.mmtcpamp.com) खरेदी -विक्री करण्यात येते. ते या संस्थेकडे सुरक्षित ठेवण्यात येते. तसेच त्यावर योग्य परतावा पण मिळतो.

हे सुद्धा वाचा