Akshaya Tritiya: ‘डिजिटल गोल्ड’ खरेदीची संधी, एक रुपयांपासून गुंतवणूक; ‘या’ कंपनीची आकर्षक सेवा

सोने खरेदी करू इच्छिणारे ग्राहक केवळ एक टॅपवर क्रेडिटबी अॅप वरुन सोने खरेदी करू शकतात. सध्या ही ऑफर केवळ निवडक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. टप्प्याटप्याने सर्व ग्राहकांसाठी खुली केली जाणार आहे.

Akshaya Tritiya: ‘डिजिटल गोल्ड’ खरेदीची संधी, एक रुपयांपासून गुंतवणूक; ‘या’ कंपनीची आकर्षक सेवा
डिजिटल गोल्ड Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 5:34 PM

नवी दिल्ली : ऑनलाईन कर्ज सेवा प्रदाती डिजिटल कंपनी क्रेडिटबीने (KreditBee) अक्षय्य तृतीयेच्या पूर्वी नवीन सेवा सुरू केली आहे. क्रेडिटबीद्वारे डिजिटल गोल्ड इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट क्रेडिटबी ’24K गोल्ड’ लाँच करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सोने खरेदी करु इच्छिणारे ग्राहक केवळ एक टॅपवर क्रेडिटबी अॅप वरुन सोने खरेदी करू शकतात. सध्या ही ऑफर केवळ निवडक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. टप्प्याटप्याने सर्व ग्राहकांसाठी खुली केली जाणार आहे. किमान एक रुपयापासून कमाल तीन लाखांपर्यंत सोन्यामध्ये गुंतवणूक (Gold Investment) करू शकतात. कंपनी लवकरच या मर्यादेच्या पलीकडे अधिक रकमेची गुंतवणूक सुविधा उपलब्ध करणार आहे. कंपनीने नव्या सेवेसाठी सेफगोल्ड (safegold) सोबत सहकार्यात्मक भागीदारी केली आहे.

तत्काळ अन् त्वरित:

सेफगोल्ड हा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ज्याद्वारे ग्राहक थेट सोन्याची डिजिटल खरेदी-विक्री करण्यास सक्षम ठरतात. क्रेडिटबीने ग्राहकांना तत्काळ, सुरक्षित आणि वास्तवि वेळेत सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुविधा प्रदान केली आहे.

कधीही अन् कुठेडी डिलिव्हरी:

खरेदी केलेल्या सोन्याचे कॉईन किंवा बारमध्ये देखील रुपांतर करण्याची मुभा असणार आहे. ग्राहकांना प्रत्यक्ष सोन्याची आवश्यकता असल्यास देशभरातून आपल्या घरात सोन्याची डिलिव्हरी प्राप्त करू शकतो. मात्र, सोन्याच्या डिलिव्हरी साठी सोन्याचे प्रमाण किमान 5 ग्रॅम असावे. सोन्याचे व्यवहार सेफगोल्डद्वारे फ्री ट्रान्झिट इन्श्युरन्सद्वारे सुरक्षित करण्यात आले आहे.

क्रेडिट बी द्वारे सोने खरेदीचे फायदे-

1.ग्राहकांना खरेदी व विक्री साठी प्रमाणित 24 कॅरेट गोल्ड उपलब्ध होते

2. ग्राहक कमाल एक ते किमान तीन लाख रुपयांचे सोने खरेदी करू शकतात.

3.सोन्याला 100 टक्के विमा असलेल्या सुरक्षित संग्रहामध्ये ठेवले जाते.

4.ग्राहक थेट आपल्या घरी सोन्याच्या डिलिव्हरीचा थेट लाभ घेऊ शकतात. किंवा मर्चंट पार्टनरच्या माध्यमातून सोन्याचं रुपांतरण करू शकतात.

5.ग्राहक सेफगोल्ड स्टोअरमधील डिजिटल गोल्डला वर्तमान बाजारभावात विक्री देखील करू शकतात.

गुंतवणूक कशी कराल?

क्रेडिटबी अपमध्ये साईन-इन करा. डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी ‘डिजिटल गोल्ड सेक्शन’वर क्लिक करा. तुम्ही तुमच्या बजेटनुसार सोने खरेदी याद्वारे निश्चिंतपणे करू शकाल.

इतर बातम्या :

पामतेल बाजारात या शेअर्सचे ‘तेल’ काढणार!

Maharashtra Day 2022 : महाराष्ट्रदिनी ‘महाराष्ट्र एमएसएमई एक्सपो 2022’चे आयोजन, वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणार तीन दिवसीय व्यावसायिक प्रदर्शन

Elon Musk: एलॉन मस्क यांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची तीव्र इच्छा, पण ‘या’ अडथळ्यांचा करावा लागेल सामना

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.