कॅनरा आणि करूर वैश्य बँकेच्या ग्राहकांना EMI साठी मोजावे लागणार ज्यादा पैसे, कर्जदरात मोठी वाढ!

| Updated on: Jun 07, 2022 | 8:37 AM

MCLR हा कोणत्याही बँकेचा संदर्भ दर असतो जो गृहकर्जाचा किमान दर ठरवतो. 2016 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने MCLR दर लागू करण्यापूर्वी, मूळ दराच्या आधारावर गृहकर्जाचे व्याजदर निश्चित केले होते. मुळामध्ये म्हणजे MCLR वाढल्यामुळे ग्राहकांचे नुकसान होते, त्यांचे सध्याचे कर्ज महाग होते. याचाच एक परिणाम म्हणजे ग्राहकाला EMI जास्त भरावा लागतो.

कॅनरा आणि करूर वैश्य बँकेच्या ग्राहकांना EMI साठी मोजावे लागणार ज्यादा पैसे, कर्जदरात मोठी वाढ!
Image Credit source: istockphoto.com
Follow us on

मुंबई : देशातील दोन खाजगी क्षेत्रातील बँकांनी (Bank) त्यांचे कर्ज दर सुधारित केले आहेत. यामुळे आता ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. कॅनरा बँक आणि करूर वैश्य बँकेने कर्जाचा हप्ता म्हणजेच तुमचा ईएमआय वाढवला आहे. निधी आधारित कर्ज दर (MCLR) 0.05 टक्क्यांनी वाढवून 7.40 करण्यात आला आहे. एक वर्षाच्या कालावधीसह टक्के बँकेने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी (MCLR) (Duration) दर 7.30 टक्क्यांवरून 7.35 टक्के केला आहे. कॅनरा बँकेने शेअर बाजाराला सांगितले की नवीन दर 7 जून 2022 पासून लागू होतील, म्हणजेच आजपासून कॅनरा बॅंकेचे नवीन दर लागू होणार आहेत. यामुळे हे निश्चित झाले आहे की, आता ग्राहकांना ईएमआयसाठी (Customer EMI) जास्त पैसे मोजावे लागणार. MCLR वाढवण्याचा परिणाम सर्व प्रकारच्या कर्जांवर दिसून येईल. MCLR वाढल्याने वाहन, घर आणि इतर सर्व प्रकारची किरकोळ कर्ज महाग होणार आहेत.

MCLR लागू झाल्याने ग्राहकांना मोठा फटका

MCLR हा कोणत्याही बँकेचा संदर्भ दर असतो जो गृहकर्जाचा किमान दर ठरवतो. 2016 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने MCLR दर लागू करण्यापूर्वी मूळ दराच्या आधारावर गृहकर्जाचे व्याजदर निश्चित केले होते. मुळामध्ये म्हणजे MCLR वाढल्यामुळे ग्राहकांचे नुकसान होते, त्यांचे सध्याचे कर्ज महाग होते. याचाच एक परिणाम म्हणजे ग्राहकाला EMI जास्त भरावा लागतो. जेव्हा आपण बँकेकडून कर्ज घेतो, तेव्हा बँकेकडून आकारल्या जाणार्‍या किमान व्याजदराला बेस रेट म्हणतात. बँक कोणालाही बेस रेटपेक्षा कमी दराने कर्ज देऊ शकत नाही. या बेस रेटच्या जागी बँका आता MCLR वापरत आहेत.

हे सुद्धा वाचा

रेपो दरात मोठी वाढ होण्याची देखील शक्यता

RBI च्या पतधोरणाच्या आढाव्याच्या काही दिवस आधी दरवाढ केली जाते. आरबीआयच्या बैठकीतील निर्णयांचे निकाल बुधवारी समोर येतील. तसेच या बैठकीमध्ये रेपो दरात मोठी वाढ होण्याची देखील शक्यता आहे. खाजगी क्षेत्रातील करूर वैश्य बँकेने शेअर बाजारामध्ये सांगितले की, त्यांनी बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) 0 40 टक्क्यांनी 13.75 टक्के आणि बेस रेट 0.40 टक्क्यांनी 8.75 टक्क्यांनी वाढवला आहे. BPLR हे MCLR शासनापूर्वीचे जुने कर्ज मानक आहे. सध्या बँका कर्ज वितरणासाठी बाह्य बेंचमार्क किंवा रेपो लिंक्ड लेंडिंग दरांचे पालन करतात.