ड्रोन उडवणाऱ्यांना विशेष विमा पॉलिसीची खूशखबर; विविध प्रकारच्या नुकसानीमध्ये मिळणार भरपाई

| Updated on: Aug 14, 2021 | 8:56 AM

ही अनेक प्रकारचे लाभ मिळवून देणारी आहे. या विविध लाभांमध्ये नऊ अ‍ॅड-ऑन कव्हर आणि प्रतिउपयोगी भरपाईच्या मॉडेलचा समावेश आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या वैयक्तीक गरजांनुसार एक व्यापक अनुभव दिला जाऊ शकतो.

ड्रोन उडवणाऱ्यांना विशेष विमा पॉलिसीची खूशखबर; विविध प्रकारच्या नुकसानीमध्ये मिळणार भरपाई
ड्रोन उडवणाऱ्यांना विशेष विमा पॉलिसीची खूशखबर; विविध प्रकारच्या नुकसानीमध्ये मिळणार भरपाई
Follow us on

मुंबई : आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने ड्रोन ऑपरेटर्ससाठी विशेष स्वरुपाचा व्यापक विमान विमा लॉन्च केला आहे. या विम्याअंतर्गत ड्रोनच्या माध्यमातून होणारी कोणतीही चोरी किंवा नुकसानीपासून संरक्षण मिळते. अर्थात या सर्व नुकसानीला आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सच्या विमान विमाअंतर्गत कव्हर करण्यात आले आहे. या विम्यामध्ये पॅलोड (कॅमेरा/उपकरण) यासह थर्ड पार्टी देयकांचाही समावेश आहे. भारतात देशांतर्गत विमान कंपन्या तसेच विमान ताफा दोन्हींसाठी विमान जोखम कमी करण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डने ही विशेष विमा योजना लॉन्च केली आहे. कंपनीला एक दशकाहून अधिक कालावधीचा अनुभव आहे तसेच विमान जोखीमच्या दाव्यांचा वेळीच निपटारा करण्यासाठी विशेष कौशल्यही आहे. (Compensation will now be provided for various types of drone damage)

ड्रोन विमा उत्पादनाद्वारे व्यापक प्रमाणात विमा संरक्षण पुरवले जाते. याअंतर्गत दोन्ही पर्याय निवडले जाऊ शकतात. एक ऑपरेटर नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) आणि नागरी उड्डाण मंत्रालय (एमओसीए) द्वारा मान्यताप्राप्त कोणत्याही व्यावसायिक उपयोगासाठी समर्पक आणि देयके कव्हर दोन्हींचा पर्याय निवडू शकतो.

सहा प्रकारांचे विमा संरक्षण

व्यापक धोरणामध्ये सहा प्रकारांच्या जोखीमचा समावेश आहे. समर्पक कव्हर पॉलिसीअंतर्गत चोरी आणि गायब होण्याबरोबरच ड्रोनला होणारे कोणतेही नुकसान कव्हर केले जाते. तोडफोड किंवा वेळेनुसार हळूहळू बिघाडामुळे होणारे कोणतेही नुकसान तसेच डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास या विम्याअंतर्गत कोणतेही संरक्षण पुरवले जात नाही. पॅलोड कव्हर आणि इक्विपमेंट कव्हर पॅलोडचे आकस्मिक भौतिक नुकसानीपासून संरक्षण पुरवते.

दुर्घटना कव्हर

ही विमा पॉलिसी भारतामध्ये ड्रोन संचालनादरम्यान दुर्घटना घडून होणाऱ्या शारीरिक दुखापतीसाठी विमाधारक किंवा अधिकृत ऑपरेटरला एक वैयक्तीक सुरक्षा प्रदान करते. याव्यतिरिक्त पॉलिसी विमाधारक/अधिकृत ऑपरेटरला वैद्यकीय उपचारांचीही सुविधा प्रदान करते. ड्रोनच्या उड्डाणादरम्यान होणाऱ्या शारिरीक दुखापतीनंतर रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास त्यातही या विमा पॉलिसीअंतर्गत भरपाई मिळते. याव्यतिरिक्त आयसीआयसीआय लोम्बार्डकडून थर्ड पार्टी अर्थात त्रयस्थ पार्टी देयकेही सादर केली जात आहेत. यात ड्रोनच्या संचालनादरम्यान होणार्या नुकसानीला कव्हर केले जाऊ शकते.

अनेक प्रकारचे लाभ

ही अनेक प्रकारचे लाभ मिळवून देणारी आहे. या विविध लाभांमध्ये नऊ अ‍ॅड-ऑन कव्हर आणि प्रतिउपयोगी भरपाईच्या मॉडेलचा समावेश आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या वैयक्तीक गरजांनुसार एक व्यापक अनुभव दिला जाऊ शकतो. अ‍ॅड-ऑन-कव्हरमध्ये ऐच्छिक भाडे शुल्क, ड्रोन युद्ध देयके, सायबर देयके कव्हर, गोपनीयता सुरक्षा कव्हर आणि बीव्हीएलओएस सपोर्ट यांचा समावेश आहे. प्रतिउपयोगी मॉडेल ग्राहकांना त्यांच्या आवश्यकतेच्या आधारावर पॉलिसी निवडण्याची सुविधा देते. ग्राहक एक दिवसाची पॉलिसी, एक आठवड्याची पॉलिसी, एक महिन्याची पॉलिसी किंवा वार्षिक पॉलिसीही निवडू शकतो. ड्रोन उद्योगाने अलिकडच्या काळात जबरदस्त विकास क्षमता सिद्ध केली आहे. त्याच अनुषंगाने या उद्योगात विशेष व्यापक स्वरुपाच्या विमा योजनेची आवश्यकता निर्माण झाली आहे. आपली योजना ही गरज पूर्ण करून सर्वोत्तम सुरक्षा प्रदान करते, असा दावा आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स प्रमुख संजय दत्ता यांनी केला आहे. (Compensation will now be provided for various types of drone damage)

इतर बातम्या

वैशाली वीर झनकर यांना एक दिवसाची पोलीस कोठडी, उद्या कोर्टात पुन्हा हजर करणार, दिवसभरात काय-काय घडलं?

पत्नीची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करणं बेकायदेशीर नाही, मुंबई सेशन कोर्टाचा निकाल