वैशाली वीर झनकर यांना एक दिवसाची पोलीस कोठडी, उद्या कोर्टात पुन्हा हजर करणार, दिवसभरात काय-काय घडलं?

लाचखोर अधिकारी वैशाली वीर झनकर यांना शुक्रवारी (13 ऑगस्ट) न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वैशाली वीर झनकर यांना एक दिवसाची पोलीस कोठडी, उद्या कोर्टात पुन्हा हजर करणार, दिवसभरात काय-काय घडलं?
नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर

नाशिक : लाचखोर अधिकारी वैशाली वीर झनकर यांना शुक्रवारी (13 ऑगस्ट) न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिक्षण संस्था चालकांकडून मंजुरीच्या कामासाठी चालकामार्फत 8 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या आहेत. त्यांना ठाणे एसीबीने शुक्रवारी सकाळी अटक केली. त्यानंतर त्यांना नाशिक एसीबीने ताब्यात घेतलं आहे.

वैशाली वीर झनकर या गेल्या दोन दिवसांपासून फरार झाल्या होत्या. त्यांना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता उद्यापर्यंत पोलीस कोठडी तर उर्वरित दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वीर यांना उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

जामीन अर्जावर उद्या सुनावणी

आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर या सध्या फरार होत्या. त्यांनी आपली रवानगी तुरुंगात होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती. यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या वतीने अॅड. अविनाश भिडे यांनी हा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी (14 ऑगस्ट) सुनावणी होणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितली होती. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आलंय. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.

अनुदानाला मंजुरीसाठी संस्थेकडे 9 लाखांची मागणी, 8 लाखावर तडजोड

आरोपी शिक्षणाधिकाऱ्यांनी एका संस्था चालकांकडे सरकारकडून मिळणारं 20 टक्के अनुदान मंजूर करण्यासाठी ही लाच मागितली होती. संस्था मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरु करण्याच्या ऑर्डरची मागणी करत होती. ही ऑर्डर करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेकडून सुमारे 9 लाख रुपयांची लाच मागितली. यावेळी तक्रारदारांनी तडजोडीअंती 8 लाख रुपये देण्याचे कबूल केले. मंगळवारी (10 ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचला ठाणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचला.

शासकीय वाहनावरील चालकाच्या माध्यमातून लाचखोरी

यानंतर वीर यांच्या शासकीय वाहनावरील चालक ज्ञानेश्‍वर सूर्यकांत येवले याने तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारली. याचवेळी चालक येवले यास पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांचे नाव घेतले. त्यानंतर पथकाने तत्काळ थेट झनकर यांच्या दालनात जाऊन चौकशी केली.

हेही वाचा : लाचखोरी प्रकरणात नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर फरार घोषित

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI