Drumstick Farming: एकदाच 50 हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षांपर्यंत खोऱ्याने पैसे कमवा

| Updated on: Aug 01, 2021 | 10:08 AM

Farming Business | शेवग्याच्या झाडाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुण असतात. शेवग्याच्या झाडांची लागवड करण्यासाठी फारसा खर्चही येत नाही. अवघ्या एका एकरात शेवग्याची लागवड करून तुम्ही लाखोंचे उत्पन्न मिळवू शकता.

Drumstick Farming: एकदाच 50 हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षांपर्यंत खोऱ्याने पैसे कमवा
शेती
Follow us on

मुंबई: तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शेतीच्या व्यवसायात नशीब आजमवायला हरकत नाही. कारण, अलीकडच्या काळात पारंपारिक शेतमालाशिवाय आरोग्याच्यादृष्टीने अचानक महत्व प्राप्त झालेल्या पिकांची मागणीही वाढली आहे. अशा नगदी पिकांच्या शेतीमधून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमावू शकता.

अलीकडच्या काळात शेवग्याच्या शेंगाची शेती फायद्याचा व्यवसाय ठरत आहे. शेवग्याच्या शेंगा या आपल्याकडील जेवणात सर्रास वापरल्या जातात. मात्र, शेवग्याच्या झाडाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुण असतात. शेवग्याच्या झाडांची लागवड करण्यासाठी फारसा खर्चही येत नाही. अवघ्या एका एकरात शेवग्याची लागवड करून तुम्ही लाखोंचे उत्पन्न मिळवू शकता.

शेवग्याच्या झाडात असणाऱ्या औषधी गुणांमुळे त्याला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे निर्यातीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे जगभरातून औषधी वनस्पती म्हणून शेवग्याची मागणी वाढली आहे. इंग्रजीत ड्रमस्टिक म्हणवल्या जाणाऱ्या शेवग्याचे वैज्ञानिक नाव मोरिंगा ओलीफेरा असे आहे. या झाडांना फार पाण्याची गरज नसते. त्यामुळे जोडपीक म्हणूनही शेवग्याच्या झाडांची लागवड करता येऊ शकते. उष्ण हवामान असलेल्या परिसरातच शेवग्याचे झाड चांगले वाढते. थंड प्रदेशात हा व्यवसाय तितकासा फायदेशीर ठरणार नाही.

इंजिनिअर, एमबीए तरुणांनी कुक्कुटपालनाची वाट धरली

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगार होण्याची भीती आणि करिअरमधील असुरक्षिततेमुळे औरंगाबादमधील अभियंते आणि व्यवस्थापन पदवीधर आता कुक्कुटपालन आणि शेळी पालन यासारखे पर्याय स्वीकारत आहेत. औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात (केव्हीके) कुक्कुटपालन व बकरी पालन अभ्यासक्रमातील तज्ज्ञ डॉ. अनिता जिंतूरकर यांनी पीटीआयला सांगितले की, जीवनात व्यावसायिक स्थिरता असावी यासाठी 20 अभियंते व व्यवस्थापन पदवीधारकांनी अलीकडेच कुक्कुटपालन पालन अभ्यासक्रमाला नोंदणी केली आहे.

कुक्कुटपालन अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या अभियंत्यांना असे वाटते की ते ठराविक पगार मिळवण्यासाठी दरमहा बरेच तास काम करत असत. कोविड 19 मुळे नोकरीच्या अनिश्चिततेमुळे यापैकी काही अभियंता आणि व्यवस्थापन पदवीधरांनी कुक्कुटपालनाला नोंदणी केली. कुक्कुटपालन करताना ठराविक वेळ काम करून अधिक नफा मिळवता येईल असा विश्वास असल्याने कुक्कुटपालन व शेळी पालन करण्याचा निर्णय घेतला आहे असल्याचं पदवीधरांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या:

शेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई

सोयाबीनला विक्रमी झळाळी, क्विंटलचा दर 9 हजारांच्या पार, उच्चांकी दराचा फायदा नेमका कुणाला?

औषधी गुणांनी संपन्न, अनेक आजारांवर गुणकारी, शेवग्याच्या शेतीतून आर्थिक कमाईची संधी, वाचा सविस्तर