शेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई

धानाचे कोठार म्हणून संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात शेतकरी नवनवे प्रयोग करत आहेत.

शेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई
गोंदियात ड्रॅगन फ्रुटची शेती
शाहिद पठाण

| Edited By: Yuvraj Jadhav

Jul 31, 2021 | 5:03 PM

गोंदिया: धानाचे कोठार म्हणून संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात शेतकरी नवनवे प्रयोग करत आहेत. प्रयोगशील आणि प्रगतीशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी धानाच्या पट्ट्यात सर्वसामान्य नागरीकांना ड्रगन फ्रुट खाता यावा यासाठी ड्रँगन फ्रुटची यशस्वी शेती केलीय. ठाकूर यांनी त्यातून लाखो रुपयांचा नफासुद्धा कमावला आहे.

धानासाठी प्रसिद्ध अशा गोंदियात ड्रॅगन फुटची लागवड

धान उत्पादकांचा जिल्हा अशी सर्वदूर ख्याती असलेल्या गोंदिया जिल्ह्याची ओळख हळूहळू बदलत चालली आहे. केवळ धानाच्या शेतीवरच अवलंबून न राहता शेतकरी धानाच्या शेतीला पर्याय शोधत आहे. विदेशात पिकणाऱ्या ड्रॅगन फळाची लागवड आपल्याकडील शेतीत करुन त्यातून उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग गोंदिया तालुक्यातील मजितपूर येथील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी केला आहे.

10 एकरात ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग

परदेशात पिकणाऱ्या फळांची लागवड आपल्या देशात करून त्याचे उत्पादन घेणे तसे आव्हानात्मक असते. जैविक शेतीच्या क्षेत्रात अग्रेसर राहणारे कृषी व्यवसायिक शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी परदेशी फळाच्या शेतीचा प्रयोग आपल्या 10 एकर शेतात केला. ते फळ म्हणजे ड्रॅगन फ्रुट होय. थायलंड, व्हिएतनाम व श्रीलंकेसारख्या देशात या फळाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील तीन चार वर्षांपासून या फळाची भारतात लागवड केली जात आहे. धान उत्पादनासाठी प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्यात ड्रॅगन फ्रुटची यशस्वी शेती करत असल्याचं भालचंद्र ठाकूर यांनी सांगितलंय.

ड्रॅगन फ्रुट हा तसा श्रीमंतांचा फळ म्हणून ओळखला जातो. गोंदिया जिल्ह्याची भाताचा कोठार म्हणून सर्वदूर ओळख असून धान पीक येथील शेतकऱ्यांचा मुख्य आहे. मात्र, गोंदियातील प्रगतीशील शेतकरी भालचंद्र ठाकूर आपल्या शेतात नवनवे प्रयोग नेहमीच करत असतात. आता त्यांनी दहा एकर शेतीत ड्रॅगन फ्रुटची शेती करत ती यशस्वी करूनसुद्धा दाखवल्याचा आनंद आहे, असं भालचंद्र ठाकूर म्हणाले.

धान पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज

धान पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे येथील शेतकरी कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाच्या सावटात सापडतो.तेव्हा ड्रॅगन फ्रूट हा व्हिएतनाम देशाने अतिशय कमी पाणी आणि कमी कालावधीत विकसित केलेली फळाची जात आहे. त्यामुळे कमी पाणी कमी खर्चात ड्रॅगन फ्रुटची बाग फुलविली.आणि सर्वसामान्य नागरीकांना हा फळ कमी खर्चात खाता यावं यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं राजन ठाकूर यांनी सांगितलं. तर थायलंड, व्हिएतनाम किंवा श्रीलंका देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादित होत असलेल्या ड्रॅगनची शेती आता गोंदियासारख्या धानाच्या पट्ट्यातही यशस्वीरीत्या करण्यात त्यांना यश आले.

इतर बातम्या:

ब्राझीलमध्ये विरघळणार भारतीय साखरेचा गोडवा, व्यापाऱ्यांनी आधीच केली निर्यात करारावर स्वाक्षरी

Weather Update : ठाणे, पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज, विदर्भातही पुढचे चार दिवस पावसाचे

Gondia Farmer Bhalchandra Thakur successful in Dragon Fruit farming earn lakh rupees

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें