Weather Update : ठाणे, पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज, विदर्भातही पुढचे चार दिवस पावसाचे

Weather Update today : नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढचे चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय ठाणे, रायगड, पुणे आणि साताऱ्यात येत्या तीन तासात मध्यम ते अती मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Weather Update : ठाणे, पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज, विदर्भातही पुढचे चार दिवस पावसाचे
आजचा पावसाचा अंदाज

नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढचे चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय ठाणे, रायगड, पुणे आणि साताऱ्यात येत्या तीन तासात मध्यम ते अती मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. सध्या नागपुरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. नागपूरसह परिसरात ढगाळ हवामान आणि रिमझीम पाऊस होत आहे. रात्रीपासूनच पडत असलेला पाऊस येत्या चार दिवसात जोर पकडण्याचा अंदाज आहे.

2 ऑगस्टपर्यंत कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 30 जुलै रोजी राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, 31 जुलै रोजी चार जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. 1 ऑगस्टला केवळ रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना पावासाचा अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून 2 ऑगस्टपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानाच्या अधिक माहितीसाठी आयएमडीच्या मुंबई आणि नागपूर वेधशाळेच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या  

Weather Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून नवा ॲलर्ट जारी

Maharashtra Cabinet : पंचनामे पूर्ण झाल्यावर पूरग्रस्तांना मदत; मंत्रिमंडळ बैठकीतील 5 महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI