Weather Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून नवा ॲलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून 2 ऑगस्टपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Weather Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून नवा ॲलर्ट जारी
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 3:43 PM

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून 2 ऑगस्टपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानाच्या अधिक माहितीसाठी आयएमडीच्या मुंबई आणि नागपूर वेधशाळेच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.

राज्यातील पावसाची आजची स्थिती कशी राहील?

हवामान विभाग पावसाच्या स्थिती संदर्भात अ‌ॅलर्ट जारी करते. आजच्या दिवसासाठी हवामान विभागनं ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.

2 ऑगस्टपर्यंत कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 30 जुलै रोजी राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, 31 जुलै रोजी चार जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. 1 ऑगस्टला केवळ रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना पावासाचा अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय. त्यामुळे मावळ तालुक्यातील भात शेतकरी चिंतेत आहे. पंधरा हजार हेक्टर पैकी अडीचशे हेक्टर क्षेत्र वाहून गेलंय.तर एकूण अकराशे हेक्टर पिकाचे नुकसान झालंय. आजपर्यंत जुलै महिन्यात इतका कधी पाऊस झालाच नव्हता असं इथले शेतकरी सांगतात. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला 500 मिलिमीटर पाऊस झाला होता, यंदा तर 1700 मिलिमीटरची नोंद झाली. म्हणजे तिप्पट पाऊस कोसळल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

पाटणच्या डावरे चोपडेवाडी गावाजवळचा डोंगर खचू लागला

पाटण ढेबेवाडी विभागातील येथील डावरी चोपडेवाडी गावच्या खाली असणारा डोंगर पाऊसाने खचु लागला आहे. यामुळे 65 घरांना धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टीच्या काळात अनेक एकर जमिन वाहून गेली आहे. नागरिकांनी मिळेल तेथे आसरा घेतला असून शासनाने नागरिकांना संसारोपयोगी साहित्य व आश्रय देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. त्या गावामध्ये शासकीय यंत्रणा येथे पोहचलीच नसल्याची माहिती आहे.

इतर बातम्या:

Maharashtra Corona Update : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक, मुंबई लोकलबाबत काय निर्णय होणार?

वडेट्टीवार म्हणाले, खात्यावर पैसे पाठवू, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, बँक खाते नाही त्यांना रोख रक्कम द्या!

Maharashtra Rain Update IMD issue yellow alert for districts of kokan and Western Maharashtra

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.