FlyBig : कुठं कुठं जायाचं फिरायला… केवळ 999 रुपयांत लुटा विमान प्रवासाचा आनंद; काय आहे Flybigची फेस्टिव्ह ऑफर!

| Updated on: Jul 14, 2022 | 4:19 PM

FlyBig : Flybig विमान कंपनीने आणलेल्या फेस्टिव्ह ऑफरअंतर्गत अवघ्या 999 रुपयांत विमान प्रवास करता येणार आहे. यापूर्वी एअर एशिया, गो फर्स्ट इत्यादी कंपन्यांनीही कमी पैशांत विमान प्रवासाच्या अनेक ऑफर्स जाहीर केल्या होत्या.

FlyBig : कुठं कुठं जायाचं फिरायला... केवळ 999 रुपयांत लुटा विमान प्रवासाचा आनंद; काय आहे Flybigची फेस्टिव्ह ऑफर!
केवळ 999 रुपयांत लुटा विमान प्रवासाचा आनंद
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

वीकेंडला कुठे फिरायला जायची इच्छा आहे, पण बजेट कमी पडतयं? हरकत नाही. आम्ही तुम्हाला अशा काही स्पेशल ऑफर्सची माहिती देऊ, ज्यामुळे तुमचे टेन्शन दूर होईल. फ्लायबिग या प्रादेशिक विमान कंपनीने (flybig) प्रवाशांसाछी एक खास ऑफर (offer) आणली असून , त्याद्वारे अवघ्या 999 रुपयांमध्ये त्यांना विमान प्रवासाचा आनंद लुटता येईल. जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सध्या विमान कंपन्यांकडून (airlines) अनेक ऑफर्स आणल्या जात आहे. यापूर्वी एअर एशिया, गो फर्स्ट इत्यादी विमान कंपन्यांनीही कमी पैशांत विमान प्रवासाची ऑफर जाहीर केली होती. कंपनीने आजपासून (14 जुलै) फ्लायबिग फेस्टिव्ह सेलची घोषणा केली असून ही ऑफर 20 जुलै 2022 पर्यंत सुरू राहणार आहे.

 

काय आहे फ्लायबिग फेस्टिव्ह सेल

या सेलअंतर्गंत 14 जुलै 2022 ते 20 जुलै 2022 या कालावधीत तुम्ही अवघ्या 999 रुपयांत विमान तिकीट बुक करु शकता. या दरम्यान बुक करण्यात आलेल्या तिकीटावर 25 जुलै 2022 ते 24 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रवास करता येऊ शकेल. या सेलअंतर्गत 999 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंतची एकूण 10,000 तिकिटं बुक करता येऊ शकतात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गुवाहाटी ते पासीघाट आणि रिटर्न जर्नीसाठी 999 रुपयांत तिकीट उपलब्ध आहे. तर गुवाहाटी ते तेजू, हैदराबाद ते गोंदिया या प्रवासासाठी 1500 रुपये मोजावे लागतील. तसेच इंदोर ते गोंदिया, हैदराबाद ते औरंगाबाद या प्रवासासाठी तिकीटाची किंमत 2000 रुपये आहे. तर कलकत्ता ते आगरताळा, हैदराबाद ते भोपाळ या प्रवासासाठी 3000 रुपये तिकीट असेल. मात्र ह्या केवळ तिकिटाच्या मूळ किमती असून त्यावर कर आणि अधिकची फी लागू होईल, असे फ्लायबिग कंपनीने स्पष्ट केले आहे.

इतर विमान कंपन्यांच्या मान्सून ऑफर

यापूर्वीही अनेक विमान कंपन्यांनी मन्सून ऑफर जाहीर करत प्रवाशांना कमी पैशांत विमान प्रवास करण्याची संधी दिली होती. एअरएशियाने जाहीर केलेल्या इंडिया स्प्लॅश सेल अंतर्गत दिल्ली – जयपूर प्रवासासाठी तिकिटाची किंमत 1479 रुपयांपासून सुरू झाली होती. तर गो फर्स्ट या विमान कंपनीच्या मान्सून ऑफरमध्ये देशआंतर्गंत प्रवासासाठी तिकीटाची किंमत 1499 पासून सुरु झाली. 7 जुलै ते 10 जुलै पर्यंत ही ऑफर सुरु होती.