LENDING RATE : बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज महागणार? व्याज दराची फेररचना

| Updated on: May 10, 2022 | 1:43 AM

देशातील आघाडीच्या चार बँकांनी व्याज दरात वाढ केली आहे. एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि करुर व्यास बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे बँकांच्या कर्ज दरांत वाढ होण्याची शक्यता आहे.

LENDING RATE : बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज महागणार? व्याज दराची फेररचना
बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज महागणार?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने (RESERV BANK) रेपो दरात फेररचना करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अर्थजगतातून संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. बँकिंग वर्तुळात रेपो दरवाढीच्या (REPO HIKE) प्रतिक्रिया उमटत आहेत. देशातील आघाडीच्या चार बँकांनी व्याज दरात वाढ केली आहे. एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि करुर व्यास बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे बँकांच्या कर्ज दरांत वाढ होण्याची शक्यता आहे. रेपो दराच्या आधारावर बँकांनी व्याज दरात फेररचना करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील आघाडीची गृहवित्त पुरवठा करणाऱ्या एचडीएफसीने एमसीएलआर (MCLR) मध्ये 0.25 टक्क्यांची वाढ केली आहे. प्रत्येक कालावधीसाठी कर्ज दरांत वाढ करण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेचा कर्ज दर 7.70 टक्क्यांवर पोहोचला आहे. नवीन दराची अंमलबजावणी 7 मे पासून केली जाणार आहे.

एचडीएफसी बँकेचे नवे एमसीएलआर

· एक वर्ष- 7.50%

· दोन वर्ष- 7.60%

हे सुद्धा वाचा

· तीन वर्ष- 7.70%

· एक-तीन-सहा महिने- 7.15%-7.35%

पुणे स्थित महाराष्ट्र बँकेने सर्व कालावधीसाठीच्या एमसीएलआर मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीएलआर मध्ये 0.15 टक्के वाढ करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे सुधारित एमसीएलआरची अंमलबजावणी 7 मे पासून केली जाणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्राचे नवे एमसीएलआर

· एक वर्ष- 7.40%

· एक-तीन-सहा महिने- 6.85-7.30%

रेपो दर किती?

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. रेपो दरात 0.4 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. नव्या बदलासह रेपो दर 4.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो दर वाढीमुळे अन्य बँकांच्या कर्जदरात वाढ होणे निश्चित मानले जात आहे.

कर्ज महागणार, मागणी घटणार

रिझर्व्ह बँकेच्या नियमित समीक्षेच्या व्यतिरिक्त मध्यावधी धोरण समीक्षा रिझर्व्ह बँकेद्वारे करण्यात आली होती. उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या वाढीच्या विकासावर कर्ज दर (Loan Distribution rate) वितरणावर थेट परिणाम होऊ शकतो. रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँकांनी कर्ज दरात वाढ करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.