AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅसच्या किमतीचा पुन्हा भडका उडणार, CNG आणि PNG च्या दरात होणार आणखी वाढ? 

गॅसच्या किंमतींचा पुन्हा एकदा भडका उडणार आहे. दर सहा महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय किंमतींच्या आधारे सरकार गॅसचे दर निश्चित करते. सध्या ज्या ठिकाणाहून गॅस उत्पादन करण्यात येत आहे, त्यात 1 एप्रिलपासून दुप्पट भाव झाले आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

गॅसच्या किमतीचा पुन्हा भडका उडणार, CNG आणि PNG च्या दरात होणार आणखी वाढ? 
घरगुती गॅस वापरकर्त्यांना प्रति सिलिंडर 200 सबसिडीImage Credit source: tv9
| Updated on: May 09, 2022 | 11:54 AM
Share

गॅसच्या किंमतींचा (Gas Prices) पुन्हा एकदा भडका उडणार आहे. दर सहा महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय किंमतींच्या आधारे सरकार गॅसचे दर निश्चित करते. सध्या ज्या ठिकाणाहून गॅस उत्पादन करण्यात येत आहे, त्यात 1 एप्रिलपासून दुप्पट भाव झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (Reliance Industries Litmted) अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यांत देशातील नैसर्गिक गॅसच्या किंमतीत (Natural Gas Price) वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जागतिक स्तरावर ऊर्जा दरात (Global Energy Prices) वृद्धीचा फायदा कंपनीच्या गॅस संशोधन व व्यवसाय विभागाला होत आहे. या विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय रॉय यांनी गुंतवणुकदारांशी चर्चा करताना सांगितले की, केजी-डी 6 ब्लॉक मधून उत्पादन होत असलेल्या गॅसच्या विक्रीचे मूल्य सध्याच्या 9.92 डॉलर प्रति दहा लाख ब्रिटिश थर्मल युनिटपेक्षा अधिक असेल. परिणामी सीएनजी आणि पीएनजीृ गॅसच्या किंमती पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सर्वसामान्यांना किचन बजेटसाठी अधिकचा निधी खर्च करावा लागणार आहे.

सहा महिन्यानंतर दर निश्चिती

सरकार दर सहा महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय किंमतींच्या आधारे गॅसचे दर निश्चित करते. सध्या ज्या ठिकाणाहून गॅस उत्पादन करण्यात येत आहे, त्यात 1 एप्रिलपासून दुप्पट भाव झाले आहे असून 6.1 डॉलर एमएमबीटीयू असे सध्या भाव सुरु आहेत. तर सखोल समुद्रातील अडचणीच्या तेल उत्पादन क्षेत्रातून उत्पादन करण्यात येणा-या गॅसचे दर 9.92 डॉलर एमएमबीटीयू इतके आहेत. सहा महिन्यांच्या हिशोबाने ऑक्टोबर महिन्यात नवीन दरांची निश्चिती करण्यात येईल.

भाव भडकणार

सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा अंदाज बांधला असता, सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि नैसर्गिक वायू कंपनी ओएनजीसी त्यांच्या उत्पादन क्षेत्रातील नैसर्गिक गॅसचे भाव वाढवून 9 डॉलर एमएमबीटीयू करेल. तर अडचणीच्या आणि खोल समुद्रातील गॅससाठी हा दर दहा आकडी होईल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे गॅस संशोधन व व्यवसाय विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय रॉय यांच्या म्हणण्यानुसार, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामहीत गॅसचे मूल्य 9.92 डॉलरपर्यंत जाईल, परिणामी दुस-या सहामहीत गॅसचे दर आणखी वाढतील .

दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी.
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात.
अजितदादा पर्व संपले... तडफदार आणि झंझावाती नेतृत्व अनंतात विलीन
अजितदादा पर्व संपले... तडफदार आणि झंझावाती नेतृत्व अनंतात विलीन.
अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी
अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी.
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार.
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर.