AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम

tv9 Marathi Special Report | महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम

| Updated on: Mar 16, 2026 | 11:30 AM
Share

इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता महाराष्ट्रातील व्यावसायिक क्षेत्रावर उमटू लागले आहेत. मुंबईत महानगर गॅस कंपनीने व्यावसायिकांना पुरवठा होणाऱ्या गॅसमध्ये 20 टक्क्यांची कपात केल्याने शहरातील पाईप गॅसवर अवलंबून असलेल्या सुमारे 30 ते 35 टक्के हॉटेल व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच उद्योगांना पुरवठा होणाऱ्या गॅसमध्ये तब्बल 50 टक्क्यांची कपात करण्याची घोषणाही महानगर गॅसने केली आहे. […]

इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता महाराष्ट्रातील व्यावसायिक क्षेत्रावर उमटू लागले आहेत. मुंबईत महानगर गॅस कंपनीने व्यावसायिकांना पुरवठा होणाऱ्या गॅसमध्ये 20 टक्क्यांची कपात केल्याने शहरातील पाईप गॅसवर अवलंबून असलेल्या सुमारे 30 ते 35 टक्के हॉटेल व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच उद्योगांना पुरवठा होणाऱ्या गॅसमध्ये तब्बल 50 टक्क्यांची कपात करण्याची घोषणाही महानगर गॅसने केली आहे. मुंबईत एलपीजी गॅसच्या तुटवड्याचा परिणाम खाद्यपदार्थांच्या दरांवरही दिसून येत आहे. विशेषतः इडली आणि मेदूवड्यासारख्या पदार्थांच्या किमती वाढल्याचे चित्र आहे. गॅसची कमतरता भासत असल्याने अनेक हॉटेल चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी काही छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय चालू ठेवण्यासाठी कोळशाचा वापर करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, राज्यातील गॅस पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी घाबरून जाऊन रांगा लावण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. भारत आपल्या एकूण गरजेपैकी सुमारे 88 ते 89 टक्के कच्चे तेल आणि 45 ते 50 टक्के एलपीजी गॅस आयात करतो. इराणमधील युद्धामुळे समुद्री मार्गावर अडथळे निर्माण झाल्याने अनेक देशांच्या जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याचे पडसाद आता भारतातही उमटू लागल्याचे दिसून येत आहे.

Published on: Mar 16, 2026 11:30 AM
Follow Us