तिला’ मंत्रिमंडळात ठेवलं आहे, अन्… गिरीश महाजन आणि विजय चौधरींमधील कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
नंदूरबारच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये भाजप नेते विजय चौधरी यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे समोर आले आहे.

भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांनी रक्षा खडसे यांचा राजीनामा मागत मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणालेत, ‘हा एकनाथ खडसे उटसुट भाजपबाबत काही काही बोलत असतो आणि त्यांच्याच घरातील रक्षा खडसे हीला मंत्रिमंडळात ठेवलं आहे. एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे एकाच कुटुंबातील आहेत, मग नेहमीच एकमेकांना मदत करतात. हे किती दिवस चालवायचं? वरिष्ठांना सांगा, काहीतरी करावंच लागेल ना…’ यावर गिरीश महाजन ‘हो’ अशी प्रतिक्रिया देत असल्याचं दिसत आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच चर्चांना उधाण आले आहे.
Published on: Jul 30, 2026 10:36 AM
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर