तुमच्या PF खात्यामधील रक्कम जाणून घेण्यासाठी ‘या’ नंबरवर मिस्डकॉल द्या

| Updated on: Aug 01, 2021 | 10:42 AM

PF Account | दर महिन्याला किती रक्कम कापली जाते हे आपल्याला माहिती असले तरी काही काळानंतर पीएफ खात्यात नेमके किती पैसे जमा झाले आहेत, याचा हिशेब ठेवणे शक्य नसते.

तुमच्या PF खात्यामधील रक्कम जाणून घेण्यासाठी या नंबरवर मिस्डकॉल द्या
ईपीएफओ
Follow us on

नवी दिल्ली: प्रत्येक महिन्याकाठी आपल्या पगारातील ठराविक रक्कम ही भविष्य निर्वाह निधीत (PF Account) जमा होत असते. दर महिन्याला किती रक्कम कापली जाते हे आपल्याला माहिती असले तरी काही काळानंतर पीएफ खात्यात नेमके किती पैसे जमा झाले आहेत, याचा हिशेब ठेवणे शक्य नसते. त्यामुळे आपल्या खात्यात किती रक्कम आहे, याचा नेमका आकडा आपल्यापैकी अनेकांना माहिती नसतो.

मात्र, त्यासाठी कर्मचारी भविष्य निधि संघटनेने (EPFO) एक सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी तुम्हाला EPFOकडे नोंदणी असलेल्या तुमच्या मोबाईलवरुन 011-22901406 या क्रमांकावर मिस्डकॉल द्यावा लागेल. त्यानंतर EPFO कडून तुम्हाला एक मेसेज पाठवला जाईल. त्यामध्ये तुमच्या पीएफ खात्याचा क्रमांक, नाव, जन्मतारीख, ईपीएफ बॅलन्स आणि एकूण जमा रक्कम असा सगळा तपशील असेल.

SMS पाठवूनही चेक करु शकता बॅलन्स

तुम्ही मोबाईलवरुन SMS पाठवूनही पीएफ खात्यामधील रक्कम जाणून घेऊ शकता. त्यासाठी EPFOHO UAN ENG असे लिहून तो मेसेज 7738299899 या क्रमांकावर पाठवावा. यापैकी ENG म्हणजे तुम्हाला इंग्रजी भाषेत ही माहिती दिली जाईल. तुम्ही मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्येही ही माहिती मागवू शकता. मराठीसाठी EPFOHO UAN च्या पुढे MAR असे लिहावे.

नोकरदारांना आज मिळणार खुशखबर

गेल्या अनेक दिवसांपासून नोकरदारांचे डोळे लागून राहिलेले पीएफवरील व्याजाचे पैसे अखेर त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. हे पैसे ऑगस्ट महिन्यात नोकरदारांच्या खात्यात जमा होतील, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 ऑगस्टला हे पैसे नोकरदारांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय श्रम मंत्रालयाकडून भविष्य निर्वाह निधीवर (PF) वाढीव व्याजासाठी नुकतीच मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे 2020-21 आर्थिक वर्षासाठी पीएफच्या रक्कमेवर 8.5 टक्के व्याज मिळणार आहे. वाढलेल्या व्याजासह पीएफची रक्कम आता नोकरदारांच्या खात्यात जमा होईल.

संबंधित बातम्या:

7th Pay Commission : ..तर 95 हजारापर्यंत पगार वाढणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डबल धमाल!

सरकार पेन्शन नियमात बदल करण्याच्या तयारीत, जाणून घ्या, फायदा कसा मिळणार?

SBI Home Loan | एसबीआयची मोठी घोषणा; 31 ऑगस्टपर्यंत गृहकर्ज प्रक्रिया शुल्क माफ