7th Pay Commission : ..तर 95 हजारापर्यंत पगार वाढणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डबल धमाल!

7th pay commission pay matrix : सरकार लवकरच जूनचा महागाई भत्ताही याला जोडूनच देण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात 28 टक्क्यांऐवजी 31 टक्के महागाई भत्ता मिळेल.

7th Pay Commission : ..तर 95 हजारापर्यंत पगार वाढणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डबल धमाल!
Rupee Note
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Jul 31, 2021 | 3:46 PM

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना (7th Pay Commission Govt Employees) येत्या सप्टेंबर महिन्यात 28 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance) मिळणार आहे. मात्र आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक खुशखबर आहे. सरकार लवकरच जूनचा महागाई भत्ताही याला जोडूनच देण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात 28 टक्क्यांऐवजी 31 टक्के महागाई भत्ता मिळेल. जून 2021 चा महागाई भत्ता किती असेल हे अद्याप निश्चित नाही. मात्र AICPI च्या आकडेवारीनुसार हा भत्ता 3 टक्के असेल असं सांगण्यात येत आहे. हा भत्ता कधी दिला जाईल हे सुद्धा अजून निश्चित नाही. मात्र त्याबाबतची घोषणाही लवकरच होऊ शकते.

जर तीन टक्के महागाई भत्ता वाढला, तर सरकारी कर्मचाऱ्यांना 31 टक्के भत्ता मिळेल. जर ते शक्य झालं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा वाढेल.

ग्रेडनुसार नेमका किती पगार वाढू शकेल?

7th Pay Commission मेट्रिक्सनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांची लेवल 1 चा पगार 18 हजार रुपयांपासून 56,900 रुपयांपर्यंत आहे. म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांचं किमान वेतन 18 हजार रुपये आहे. या आधारे जर पगाराचं गणित केलं, तर सप्टेंबर महिन्यात या कर्मचाऱ्यांना दमदार पगार मिळू शकेल.

ज्यांचा पगार 18 हजार आहे, त्यांना 28 टक्क्यांनी वाढ मिळाली तर पगार किती होईल?

 • कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी = 18 हजार रुपये
 • नवा महागाई भत्ता (28%) = 5,040 दर महिना
 • जुना महागाई भत्ता (17%) = 3,060 दर महिना
 • महागाई भत्ता किती वाढला = 1980 दर महिना
 • वार्षिक वाढ – 1980 गुणिले 12 = 23760 रुपये

ज्यांचा पगार 18 हजार आहे, त्यांना 31 टक्क्यांनी वाढ मिळाली तर पगार किती होईल?

31% महागाई भत्ता झाला तर पगाराचं गणित कसं असेल?

कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी – 18 हजार रुपये

नवा महागाई भत्ता (31%) – 5,580 दर महिना

जुना महागाई भत्ता (17%) – 3,060 दर महिना

महागाई भत्ता किती वाढला – 2520 दर महिना

वार्षिक वाढ – 2520 गुणिले 12 = 30240 रुपये

बेसिक सॅलरीवर कॅल्युलेशन

ही गणना लेवल 1 नुसार दिल्या जाणारी सर्वाधिक सॅलरीवर आहे. लेवल 1 मध्ये किमान वेतन 18 हजार आहे, तर कमाल म्हणजे सर्वाधिक पगार 56,900 आहे. त्यामध्ये 28 टक्के महागाई भत्त्यानुसार या बेसिक सॅलरीवर वर्षाला महागाई भत्ता 1,91,184 रुपये होईल. त्यामुळे मूळ पगारात वार्षिक 75,108 रुपयांची वाढ होईल.

ज्यांचा पगार 56,900 आहे, त्यांना 28 टक्क्यांनी वाढ मिळाली तर पगार किती होईल?

 • 28% महागाई भत्त्याचं गणित
 • कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी – 56,900 रुपये
 • नवा महागाई भत्ता (28%) – 15,932 दर महिना
 • जुना महागाई भत्ता (17%) – 9,673 दर महिना
 • महागाई भत्ता किती वाढला – 6259दर महिना
 • वार्षिक वाढ – 6259 गुणिले 12 = 23760 रुपये

ज्यांचा पगार 56,900 आहे, त्यांना 31 टक्क्यांनी वाढ मिळाली तर पगार किती होईल?

 • 31% महागाई भत्ता झाला तर पगाराचं गणित कसं असेल?
 • कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी – 18 हजार रुपये
 • नवा महागाई भत्ता (31%) – 17,639 दर महिना
 • जुना महागाई भत्ता (17%) – 9,673 दर महिना
 • महागाई भत्ता किती वाढला – 7966 दर महिना
 • वार्षिक वाढ – 7966 गुणिले 12 = 95,592 रुपये

31 टक्के महागाई भत्त्याच्या हिशेबाने ज्यांचा पगार 56900 रुपये असेल, त्यांना वर्षाला एकूण महागाई भत्ता 2,11,668 रुपये मिळेल. यातील फरक पाहिला तर सॅलरी वर्षाला 95,592 रुपयांनी वाढेल.

संबंधित बातम्या  

चांगली बातमी: मोदी सरकार मोठी घोषणा करणार, मूळ वेतन 15000 वरून 21000 पर्यंत वाढणार

7th Pay Commission : 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख पेन्शनर्सना अशा पद्धतीनं 34500 कोटी मिळणार

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें