प्रतीक्षा कालावधी ते डेथ क्लेम; कोविड इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये मोठे फेरबदल!

| Updated on: Jan 15, 2022 | 7:57 PM

कोविड काळात इन्श्युरन्स कंपन्यांचा कारभार डबघाईला आला आहे. मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. क्लेमची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे इन्श्युरन्स कंपन्या पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी नवे धोरण आखण्याच्या तयारीत आहे.

प्रतीक्षा कालावधी ते डेथ क्लेम; कोविड इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये मोठे फेरबदल!
Insurance Policy
Follow us on

नवी दिल्ली : आपत्कालीन वैद्यकीय स्थितीत इन्श्युरन्स पॉलिसी (INSURANCE POLICY) उपयुक्त ठरतात. कोविड काळात वाढता वैद्यकीय खर्च आणि लॉकडाउनमुळे वेतन कपात यामुळे नोकरदारांसमोर मोठे संकट ओढावले. इन्युरन्स पॉलिसीमुळे लाखो रुपयांचा वैद्यकीय बिलांचा भार सहन करणे शक्य ठरते. त्यामुळे इन्श्युरन्स पॉलिसी खरेदीकडे (POLICY BUYING) अनेकांचा वाढता कल असतो. मात्र, कोविड काळात वाढते डेथ क्लेम आणि पॉलिसी क्लेमच्या संख्येमुळे इन्श्युरन्स कंपन्यांचे बजट कोलमडले आहे. इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये अन्य आजारांसाठी असणारा प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पीरियड) (WAITING PERIOD) कोविड इन्श्युरन्स धारकांसाठी लागू करण्याचा निर्णय इन्श्युरन्स कंपन्यांनी घेतला आहे. इन्श्युरन्स कंपन्यांनवर रि-इन्श्युरन्स कंपन्यांचा वाढता दबाव आहे. त्यामुळे आगामी काळात इन्श्युरन्स पॉलिसीच्या संरचनेत अनेक बदल होण्याची शक्यता आहे. तुम्ही नुकतेच कोरोनातून बाहेर पडला असाल आणि संरक्षणासाठी पॉलिसी खरेदीच्या विचारात असल्यास तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वपूर्ण आहे.

प्रतीक्षा कालावधीचं गणित

प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पिरियड) ही नवी संकल्पना नाही. वर्तमान परिस्थितीत इन्श्युरन्स पॉलिसीसाठी तीन महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. प्रतीक्षा कालावधी संपल्यानंतर इन्श्युरन्स कंपन्यांकडून पॉलिसी प्रकरणांचे मूल्यमापन केले जाते आणि त्यानुसार क्लेमचा खर्च अदा केला जातो. आजपर्यंत कोविड रुग्णांच्या बाबतीत प्रतीक्षा कालावधीची गणना होत नव्हती. मात्र, दिवसागणिक वाढते कोविड क्लेम तसेच डेथ क्लेममुळे इन्श्युरन्स कंपन्यांनी तीन महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पिरियड) लागू केला आहे. इन्श्युरन्स कंपन्या इन्श्युरन्सच्या प्रमाणात स्वतःला रि-इन्श्युरन्स करतात. त्यामुळे रि-इन्श्युरन्स कंंपन्या कोविड रुग्णांना वेटिंग पीरियड लावू इच्छिते. भारतीय इन्श्युरन्स कंपन्यांना कोविड रुग्णांसाठी प्रतीक्षा कालावधी लागू केल्याशिवाय पर्याय नाही.

इन्श्युरन्स कंपन्या तोट्यात!

कोविड काळात इन्श्युरन्स कंपन्यांचा कारभार डबघाईला आला आहे. मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. क्लेमची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे इन्श्युरन्स कंपन्या पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी नवे धोरण आत्मसात करण्याच्या तयारीत आहे. प्रतीक्षा कालावधी अशाच प्रकारच्या बदलांचा भाग आहे.

डेथ क्लेम वाढता वाढे!

कोविड विषाणू अन्य आजारांच्या तुलनेत सामान्य नाही. कोविड संसर्गाचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. मृत्यूच्या आकड्यांत वाढ होत आहे. डेथ क्लेमची संख्या अन्य आजारांच्या तुलनेत वाढत असल्यामुळे इन्श्युरन्स कंपन्यांसमोर क्लेमचा डोंगर निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या

Startup India: 16 जानेवारी हा दिवस ‘नेशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा करणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

टर्म इन्शुरन्ससाठी कंपनीला हवा ग्राहक ‘धाडधाकट’! कोरोना बाधितांना मुदत विमा घेण्यात अटींचा डोंगर, विमा कंपन्यांची रडकथा…

LIC प्लॅन | महिलांच्या स्वाबलंबनाची ‘आधारशीला’: 29 रुपयांची बचत, 3 लाखांची मॅच्युरिटी!