AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Startup India: 16 जानेवारी हा दिवस ‘नेशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा करणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

स्टार्ट अप्सचं कल्चर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे. हे कल्चर अधिक वाढवण्यासाठी 16 जानेवारी हा दिवस 'नॅशनल स्टार- अप डे' म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

Startup India: 16 जानेवारी हा दिवस ‘नेशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा करणार; पंतप्रधान मोदींची घोषणा
pm narendra modi
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 12:37 PM
Share

नवी दिल्ली: स्टार्ट अप्सचं कल्चर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे. हे कल्चर अधिक वाढवण्यासाठी 16 जानेवारी हा दिवस ‘नॅशनल स्टार- अप डे’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावासियांशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे. या दशकाला भारताचा techade म्हटलं जात आहे. या दशकात इनोव्हेशन, इंटरप्रेन्यूरशीप आणि स्टार्ट अप इकोसिस्टिमला मजबूत करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात बदल करत आहे. त्याचे तीन महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्यट्ये म्हणजे इंटरप्रेन्यूरशीपला सरकारी प्रक्रियांच्या जाळ्यातून ब्युरोक्रॅटिक्स सिलोसपासून मुक्त करणं हे होय. दुसरं वैशिष्ट्ये म्हणजे इनोव्हेशनला प्रमोट करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल मॅकेनिझमची निर्मिती करणं आणि तिसरं वैशिष्ट्ये म्हणजे तरुण इनोव्हेटर्स, युवा उद्योजकांची हँडल होल्डिंग वाढवणं हे होय, असं मोदी म्हणाले.

विद्यार्थ्यांमध्ये जागृती

विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच इनोव्हेशनबाबतचं आकर्षण निर्माण करणं आणि इनोव्हेशनलला इन्स्टिट्यूशनलाईज करणं हा आमचा प्रयत्न आहे. 9 हजाराहून अधिक अटल टिकरिंग लॅब्समधून शाळेत इनोव्हेट करणं, नव्या कल्पना निर्माण करण्यासाठी संधी देण्यात येत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

भारताची रँकिंग सुधारली

2013-14मध्ये 4 हजार पेटंट्सला मंजुरी मिळाली होती. तर गेल्यावर्षी 28 हजाराहून अधिक पेटंट्सला मंजुरी देण्यात आली आहे. 2013-14मध्ये सुमारे 70 हजार ट्रेडमार्कसची नोंदणी करण्यात आली होती. तर 2020-21मध्ये अडीच लाखाहून अधिक ट्रेडमार्कसची नोंदणी करण्यात आली आहे. 2013-14 केवळ 4 हजार कॉपीराईट्सला मंजुरी मिळाली होती, गेल्यावर्षी ही संख्या वाढून 16 हजाराच्या पुढे गेली आहे. इनोव्हेशनबाबत देशात मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सममध्ये भारताची रँकिंग सुधारली आहे. 2015 मध्ये या रँकिंगमध्ये भारत 81 व्या क्रमांकावर होता. आता इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत 46 व्या क्रमांकावर असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं.

स्टार्ट-अप्सचा सुवर्ण काळ सुरू झाला

ज्या स्पीड आणि स्केलने भारत आज युवा स्टार्ट अप तयार करत आहे, त्यातून वैश्विक महामारीतही भारताची प्रबळ इच्छाशक्ती आणि संकल्प अधोरेखित होत आहे. पूर्वी चांगली स्थिती असताना एखाद दोन कंपन्या मोठ्या होत होत्या. मात्र गेल्या काही वर्षात देशात 42 युनिकॉर्न तयार करण्यात आले आहेत. हजारो कोट्यवधींच्या या कंपन्या आत्मनिर्भर झाल्या आहेत. ही आत्मविश्वासी भारताची ओळख आहे. भारत आज वेगाने युनिकॉर्नची सेंच्युरी बनविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भारतातील स्टार्ट-अप्सचा सुवर्ण काळ आता सुरू झाला आहे, असं मला वाटतं, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Corona Cases India : देशात 2 लाख 68 हजार नवे कोरोना रुग्ण, वाढत्या मृत्यूच्या संख्येनं टेन्शन वाढलं

Army Day 2022 : 15 जानेवारीला देशभरात साजरा होतो ‘सैन्य दिवस’, इतिहास आणि महत्व काय?

UP Election 2022: भीम आर्मी-समाजवादी पार्टीचं उत्तर प्रदेशात फिस्कटलं, चंद्रशेखर आजाद यांचा अखिलेश यादवांवर हल्लाबोल

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.