सिलेंडर वेळेत घरी येत नाही, मग एजन्सीच बदला, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

| Updated on: Jul 25, 2021 | 12:24 PM

LPG Gas | यामुळे स्पर्धा निर्माण होऊन गॅस एजन्सीकडून दिल्या जाणाऱ्या सेवेचा दर्जा सुधारेल. जेणेकरून ग्राहकांना आणखी चांगली सेवा मिळेल. सध्याच्या घडीला देशभरात 29 कोटी एलपीजी ग्राहक आहेत. तर देशात इंडेन, एचपी आणि भारत गॅस या मुख्य गॅस एजन्सीज आहेत.

सिलेंडर वेळेत घरी येत नाही, मग एजन्सीच बदला, जाणून घ्या सोपी प्रक्रिया
गॅस बुक करण्यासाठी प्रथम तुम्हाला बुक गॅस सिलेंडरवर क्लिक करावे लागेल. यानंतर आपला गॅस पुरवठादार जे एचपी किंवा भारत किंवा इंडेन असेल ते निवडा. तुमचा मोबाईल नंबर, एलपीजी आयडी आणि ग्राहक क्रमांक टाका. आता तुमचा पेमेंट मोड निवडा. यामध्ये तुम्ही पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड्स, नेट बँकिंग निवडू शकता. आपण इच्छित असल्यास, आपण पेटीएम पोस्टपेड पर्याय देखील निवडू शकता. भरणा केल्यावर, तुमचे गॅस सिलेंडर बुक केले जाईल.
Follow us on

मुंबई: घरगुती सिलेंडरचा (LPG) वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एखादा ग्राहक त्यांच्या गॅस एजन्सीकडून देण्यात येणाऱ्या सेवेच्या दर्जाविषयी समाधानी नसेल तर तो दुसऱ्या गॅस एजन्सीत कनेक्शन ट्रान्सफर करु शकतो. सुरुवातीच्या काळात ही सुविधा फक्त एकदाच वापरता येईल. ज्याप्रमाणे रेशन कार्डधारकाला त्याचे दुकान किंवा डिलर बदलण्याची सुविधा आहे, तसेच या सुविधेचे स्वरुप आहे.

ही सुविधा सुरुवातीला चंदीगड, पुणे, कोईम्बतूर आणि गुडगावमध्ये सुरु केली जाईल. त्यानंतर टप्याटप्प्याने देशभरात ही सुविधा मिळेल. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग करताना ग्राहकाला कोणत्या एजन्सीकडून सिलेंडर घ्यायाचा हे ठरवता येईल.

ही सुविधा तुर्तास प्रायोगिक तत्वावर सुरु केली जाईल. जेणेकरून गॅस एजन्सीजना सुधारणेची एक संधी मिळेल, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव तरुण कपूर यांनी सांगितले. यामुळे स्पर्धा निर्माण होऊन गॅस एजन्सीकडून दिल्या जाणाऱ्या सेवेचा दर्जा सुधारेल. जेणेकरून ग्राहकांना आणखी चांगली सेवा मिळेल. सध्याच्या घडीला देशभरात 29 कोटी एलपीजी ग्राहक आहेत. तर देशात इंडेन, एचपी आणि भारत गॅस या मुख्य गॅस एजन्सीज आहेत.

फक्त एका कॉलवर मागवा 5 किलोचा LPG गॅस सिलिंडर

गॅस सिलिंडर खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. गॅस एजन्सीला आयडी प्रूफ आणि बरेच कागदपत्र द्यावी लागतात. परंतु आता एलपीजी सिलिंडर मिळणे सोपे झाले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) ने ग्राहकांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. ज्याअंतर्गत तुम्हाला फक्त एका कॉलवर घरी 5 किलो एलपीजी सिलिंडर सहज मिळू शकेल. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत.

आपण आपल्या शहरातील कोणत्याही इंडियन गॅस वितरकाकडून सहजपणे 5 किलो एलपीजी सिलिंडर खरेदी करू शकतात. जर आपण इच्छित असल्यास, आपण गॅस एजन्सीवर जाऊन देखील 5 किलोचा एलपीजी सिलिंडर लगेचच घेऊन येऊ शकतो. तिथे तुम्हाला वाट पाहण्याची गरज सुध्दा पडणार नाही.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी! BPCL च्या खासगीकरणामुळे 8.4 कोटी LPG ग्राहकांना मिळणार नाही गॅस?

फक्त एका कॉलवर मागवा 5 किलोचा LPG गॅस सिलिंडर, कागदपत्रांचीही गरज नाही

LPG Gas Cylinder Price: फेब्रुवारीत LPG सिलिंडरच्या किमतीत मोठे बदल; किती पैसे द्यावे लागणार?