ऑनलाईन पेमेंटसाठी आता फोनची गरज नाही!; घड्याळातूनच व्यवहार करता येणार

| Updated on: Mar 20, 2024 | 1:10 PM

Airtel New Smartwatch Noise Online Payment : आपण सगळेच ऑनलाईन पेमेंट करतो. त्यामुळे दैनंदिन व्यवहार करणं सोपं जातं. मात्र आता तुम्हाला आणखी एका सोप्या मार्गाने ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे. घड्याळाच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहात. वाचा...

ऑनलाईन पेमेंटसाठी आता फोनची गरज नाही!; घड्याळातूनच व्यवहार करता येणार
Follow us on

मुंबई | 20 मार्च 2024 : आधी आपण सगळे कॅशच्या माध्यमातून व्यवहार करायचो. त्यामुळे कुठेही जायचं असलं की आधी पैसे खिशात घ्यावे लागायचे. कधी पैसे घरी विसरलो तर मात्र तारांबळ उडायची. नंतर एटीएम आले. त्यामुळे एटीएम सोबत असेल. तर तुम्ही कुठेही गेलात तरी तिथे पैसे काढणं सोपं होऊन जायचं. नोटबंदीनंतर आपण सगळेच डिजीटल पेमेंटकडे वळतो. स्मार्ट फोनच्या माध्यमातून पेमेंट करता येऊ लागलं. पण आता तुमच्या जवळ फोन नसेल तरी पेमेंट करता येणं शक्य होणार आहे. हातातल्या घड्याळाच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकणार आहात.

आता घड्याळाच्या माध्यमातून पेमेंट

स्मार्ट वॉचच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट करता येणार आहे. एअरटेलने एक नवं स्मार्टवॉच लाँच केलं आहे. या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहात. ग्राहकांना आणखी सोप्या पद्धतीने ऑनलाई पेमेंट करता यावं यासाठी एअरटेलने हे नवं घड्याळ लाँच केलं आहे. एअरटेल पेमेंट बँक स्मार्टवॉच एअरटेलने लाँच केलं आहे.

कोणतं घड्याळ आहे हे?

वायरेबल ब्रँड नॉईजने एअरटेल पेमेंट्स बँक आणि मार्टर कार्डसोबत पार्टनरशीप केला आहे. Airtel Payments Bank Smartwatch मध्ये वापरकर्त्यांना Tap and pay हा ऑप्शन मिळतो आहे. या वॉचच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. एक रुपयांपासून 25 हजारांपर्यंतचं पेमेंट या वॉचमधून करता येणार आहे. हे स्मार्ट फिचर्स असणारं हे वॉच लूकवाईजही खास आहे.

या घड्याळात ब्लूटूथ कॉलिंगचं फंक्शन देखील आहे. एकदा हे घड्याळ चार्ज केलं की 10 दिवसांपर्यंत ती चार्जिंग टिकते. यात मास्टरकार्ड नेटवर्क सपोर्टेड एनएफसी चिप देखी आहे. या शिवाय पाणी आणि धुळीपासूनही हे घड्याळ स्वत:चं संरक्षण करतं.

घड्याळाची किंमत किती?

इतके सगळे फिचर्स असणारं हे घड्याळ तुमच्या खिशाला परवडणारं आहे. 2 हजार 999 रुपयात तुम्ही हे घड्याळ खरेदी करू शकणार आहात. यात ब्लॅक, ग्रे आणि ब्लू कलर ऑप्शन्स आहेत. त्यामुळे तुम्हालाही हे मोबाईल शिवाय ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर हा चांगला ऑप्शन आहे.