‘या’ लोकांनी कधीच म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू नयेत, अन्यथा…

| Updated on: Aug 22, 2021 | 11:08 AM

Mutual Fund | म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी expenses ratios प्रमाणे शुल्क आकारले जाते. सुरुवातीला हे शुल्क कमी असते. मात्र, नंतरच्या काळात हे शुल्क वाढत जाते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक गुंतवणुकीसाठी शुल्क भरायचे नसेल तर म्युच्युअल फंड हा पर्याय तुमच्यासाठी नाही.

या लोकांनी कधीच म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू नयेत, अन्यथा...
म्युच्युअल फंड
Follow us on

मुंबई: अलीकडच्या काळात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडाचा पर्याय लोकप्रिय होताना दिसत आहे. मात्र, यामध्ये मुदत ठेव किंवा अन्य कोणत्याही गुंतवणुकीप्रमाणे चांगला परतावा मिळेल, याची कोणतीही हमी नसते. म्युच्यअल फंडाची संपूर्ण भिस्त शेअर मार्केटवर असल्याने यामध्ये थोडीफार जोखीमही आहे. बाजारात मंदी असल्यास तुमचे मोठे आर्थिक नुकसानही होऊ शकते. केवळ दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी म्युच्युअल फंडाचा पर्याय फायदेशीर ठरतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी या सगळ्याचा विचार करणे गरजेचे आहे.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक कोणी करू नये?

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी expenses ratios प्रमाणे शुल्क आकारले जाते. सुरुवातीला हे शुल्क कमी असते. मात्र, नंतरच्या काळात हे शुल्क वाढत जाते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक गुंतवणुकीसाठी शुल्क भरायचे नसेल तर म्युच्युअल फंड हा पर्याय तुमच्यासाठी नाही. तसेच तुम्ही एका वर्षाच्या आतमध्येच म्युच्युअल फंडातील पैसे काढलेत तर तुम्हाला एक्झिट लोड चार्ज द्यावा लागतो.

केवळ दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीच योग्य

म्युच्युअल फंडात किमान एक वर्षाचा लॉक इन पिरीयड असतो. दीर्घकाळ गुंतवणूक करत राहिल्यासच म्युच्युअल फंडातून चांगला फायदा मिळतो. त्यामुळे तुमच्याकडे दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची क्षमता नसेल तर म्युच्युअल फंडाच्या फंदात पडू नका. तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर कर आकारला जातो. अन्य फंडांप्रमाणे याठिकाणी करातून सूट मिळत नाही.

संबंधित बातम्या:

डब्यात पैसे साठवणाऱ्या महिला आज म्युच्युअल फंड आणि स्टॉक्समध्ये खेळतात, पुरुषांनाही ‘असं’ टाकलं मागे

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताय, जाणून घ्या या 4 गोष्टी, नेहमीच कमवाल नफा

फक्त कर भरण्यापुरताच ITR चा वापर मर्यादित नसतो तर ‘या’ गोष्टींमध्येही होतो फायदा