AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त कर भरण्यापुरताच ITR चा वापर मर्यादित नसतो तर ‘या’ गोष्टींमध्येही होतो फायदा

ITR | आयकर विभागाकडून देण्यात आलेल्या या विवरण पत्राचा उपयोग घराच्या पत्त्याची पडताळणी करण्यासाठीही केला जातो. हा अधिकृत एड्रेस प्रुफ मानला जातो. तर व्यापारी लोकांसाठी ITR हा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरला जातो.

फक्त कर भरण्यापुरताच ITR चा वापर मर्यादित नसतो तर 'या' गोष्टींमध्येही होतो फायदा
| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 10:02 AM
Share

मुंबई: अलीकडच्या काळात आयकर परतावा अर्थात Icome Tax Return (ITR) हा शब्द परवलीचा झाला आहे. मात्र, केवळ कर भरण्यापुरताच ITR चा वापर मर्यादित नसतो. तर इतर अनेक गोष्टींसाठी ITR फायद्याचा ठरू शकतो. अगदी एखाद्या देशाचा व्हिसा मिळवण्यासाठीही ITR ची मदत होते.

उत्पन्नाचा दाखला

आयकर विभागाकडून देण्यात आलेल्या या विवरण पत्राचा उपयोग घराच्या पत्त्याची पडताळणी करण्यासाठीही केला जातो. हा अधिकृत एड्रेस प्रुफ मानला जातो. तर व्यापारी लोकांसाठी ITR हा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरला जातो.

कर्ज घेण्यासाठी मदत

तुम्ही गृहकर्ज घ्यायला जाता तेव्हा तुमचा सिबिल स्कोअर आणि ITR बघितला जातो. बँका तुमचा ITR पाहून कर्ज द्यायचे किंवा नाही, हे ठरवतात. ITR मुळे तुम्हाला कर्ज झटपट मिळण्यास मदत होते.

व्यापारात नुकसान झाले तर ITR आवश्यक

तुम्ही नियमितपणे ITR भरत असाल आणि तुम्हाला व्यापारात एखादवेळी नुकसान झाले तर अशावेळी ITRची आवश्यकता असते. जेणेकरुन तुम्ही सरकारसमोर नुकसान झाल्याचे सिद्ध करु शकता.

व्हिसासाठी मदत

जगातील अनेक देश व्हिसा देताना तुमच्याकडून ITR मागतात. यावरुन संबंधित व्यक्तीचे उत्पन्न आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज येतो. त्यामुळे तुम्ही कर भरत नसलात तरी ITR मुळे तुम्हाला व्हिसा मिळण्यास मदत होऊ शकते.

कर परतावा

तुम्ही दरवर्षी ITR फाईल करत असाल तर टर्म डिपॉझिटसारख्या गुंतवणुकीवर तुम्हाला कर आकारला जात नाही. त्यामुळे तुम्ही करबचत करु शकता.

संबंधित बातम्या:

जर पहिल्यांदाच ITR दाखल करायचा आहे, मग संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

ITR Filing : आयटी रिटर्न भरताना योग्य फॉर्म निवडा, अन्यथा एक चूक महागात पडणार

PHOTO | ITR Filing Rules : मृत व्यक्तीचाही आयटीआर भरणे अनिवार्य, जाणून घ्या हे नियम

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.