ITR Filing : आयटी रिटर्न भरताना योग्य फॉर्म निवडा, अन्यथा एक चूक महागात पडणार

जर तुम्ही चुकीचा आयटीआर फॉर्म भरला तर टॅक्स रिटर्न भरणे डिफेक्टिव्ह मानले जाईल किंवा अवैध मानले जाईल.

ITR Filing : आयटी रिटर्न भरताना योग्य फॉर्म निवडा, अन्यथा एक चूक महागात पडणार
Nupur Chilkulwar

|

Dec 16, 2020 | 9:17 AM

मुंबई : मूल्यांकन वर्ष (Assessment Year) 2020-21 साठी आयकर परतावा (Income Tax Return- ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. आयकर परतावा (ITR) भरताना योग्य फॉर्मची निवड करणे महत्त्वाचं असते. ITR फाईल करण्यासाठी तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे टॅक्स पेअर आहात आणि तुम्हाला कुठला फॉर्म भरायचा आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जर तुम्ही चुकीचा आयटीआर फॉर्म भरला तर टॅक्स रिटर्न भरणे डिफेक्टिव्ह मानले जाईल किंवा अवैध मानले जाईल. त्यामुळे तुम्हाला मोठं नुकसान हाऊ शकतं (Income Tax Return Filing).

कोरोनामुळे यंदा केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलैपासून वाढवून 31 डिसेंबर 2020 केली होती. ज्यांच्या खात्यांचं ऑडिट झालेलं नाही, त्यांच्यासाठी ही मुदत 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

इतक्या प्रकारचे असतात आयटीआर फॉर्म

ITR-1 : ITR-1 त्या लोकांसाठी आहे ज्यांचं एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत आहे. यामध्ये पगार, वन हाऊस प्रॉपर्टी, व्याज उत्पन्न आणि 5,000 रुपयांपर्यंतचे कृषी उत्पन्न येतं. पण, हा फॉर्म त्या लोकांसाठी नाही जे कंपनीचे संचालक आहेत किंवा ज्यांनी अनलिस्टेड इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे.

ITR 2 : हा फॉर्म त्या लोकांसाठी आणि HUFs साठी आहे, ज्यांना व्यवसाय किंवा प्रोफेशनमुळे झालेल्या नफ्यातून उत्पन्न मिळतं. पण, ITR 1 साठी हे योग्य नाही. ITR 1 मध्ये प्रत्येक उत्पन्नाच्या स्त्रोतातून होणारी कमाई ही 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असते. ज्यामध्ये भांडवली नफा, एकापेक्षा अधिक घरं, परदेशात संपत्ती, परदेशातून होणारं उत्पन्न यांचा समावेश आहे.

ITR 3 : हा फॉर्म त्या लोकांसाठी आणि HUFs साठी आहे, ज्यांना व्यवसाय किंवा प्रोफेशनमुळे झालेल्या नफ्यातून उत्पन्न मिळतं. पण, ITR 1, 2 आणि 4 भरण्यासाठी हा योग्य नाही, ज्यांना मालमत्ता किंवा गुंतवणूक विकून भांडवल नफा / तोटा झाला आहे.

ITR 4 : हा फॉर्म त्या लोकांसाठी आणि HUFs आणि फर्म्ससाठी (LLP शिवाय) आहे, ज्यांचे भारतीय नागरिक म्हणून एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच, ज्यांना अशा व्यवसाय आणि प्रोफेशनमधून उत्पन्न मिळतं, ज्यांची आयकर कायद्याच्या कलम 44 एडी, 44 एडीए किंवा 44 एई अंतर्गत गणना केली जाते, तेही हा फॉर्म भरु शकतात. भांडवली नफ्यातून उत्पन्न मिळवणाऱ्यांना आयटीआर 4 वापरता येणार नाही (Income Tax Return Filing).

ITR 5 : ITR 5, ITR-4 साठी योग्य पार्टनरशीप फर्म्सचे वेगळ्या पार्टनरशीप फर्म्ससाठी, LLPs, असोसिएशन ऑफ पर्सन्स, बॉडी ऑफ इंडिविजुअल्स, आर्टिफीशियल ज्युरीडीशियल पर्सन, लोकल अथॉरिटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी, सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट 1860 अंतर्गत रजिस्टर सोसायटी, मृत व्यक्तीची संपत्ती, दिवाळखोरांची संपत्ती, बिजनेस ट्रस्ट, इन्व्हेस्टमेंट फंड इत्यादी करदात्यांसाठी आहे. ज्यांच्यासाठी इतर कुठलाही फॉर्म लागू होत नाही.

ITR 6 : आयकर अॅक्टच्या सेक्शन 11 अंतर्गत अपवाद दावा करणाऱ्या कंपन्यापेक्षा वेगळ्या कंपन्यांसाठी हा फॉर्म आहे. याला सेक्शन 2(17) नुसार कंपन्या भरु शकतात. हा फॉर्म त्या कंपन्या भरतात, ज्या ITR 7 फॉर्म भरणाऱ्या कंपन्यांपेक्षा वेगळ्या आहेत.

ITR 7 : हा फॉर्म कंपन्यांसह त्या व्यक्तींसाठी आहे ज्यांना फक्त सेक्शन 139(4A) किंवा 139(4B) किंवा 139(4C) किंवा 139(4D) अंतर्गत आयकर परतावा सादर करण्याची आवश्यकता आहे. ज्या लोकांना आयकर कायद्याच्या सेक्शन 10 अंतर्गत उत्पन्नात सूट मिळाली असेल आणि ज्यांना आयकर परतावा भरणे बंधनकारक नाही, ते या फॉर्मचा वापर आयकर परतावा भरण्यासाठी करु शकतात.

Income Tax Return Filing

संबंधित बातम्या :

SBI आणि भारत पेट्रोलियमचे क्रेडिट कार्ड लाँच; ग्राहकांना मिळणार जबरदस्त फायदा

अर्थव्यवस्थेला झळा लागण्यास सुरुवात, शेतकरी आंदोलनामुळे रोज 3500 कोटींचे नुकसान

New Year ला लागू होणार चेक आणि डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम, RBI ने केली मोठी घोषणा

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें