नोकरी करताय, जाणून घ्या कोणत्या गोष्टींवरचा खर्च ठरतो इनकम टॅक्स फ्री

बारकाईने विचार केल्यास नोकरदारांना विशिष्ट पद्धतीने खर्च करून यामधूनही पैशांची बचत करता येऊ शकते. | Income Tax

नोकरी करताय, जाणून घ्या कोणत्या गोष्टींवरचा खर्च ठरतो इनकम टॅक्स फ्री
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी परवडणाऱ्या गृहनिर्माण कर सवलतीत मर्यादा वाढविली होती. आता आपण त्या अंतर्गत 31 मार्च 2022 पर्यंतची वजावट घेण्यास सक्षम असाल. पूर्वीची अंतिम मुदत फक्त 31 मार्च 2021 पर्यंत होती. याचा फायदा नवीन घर खरेदीदाराबरोबरच रिअल इस्टेट क्षेत्रालाही होईल.
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 8:24 AM

नवी दिल्ली: तुम्ही नोकरदार असाल तर केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या कर रचनेनुसार तुम्हाला आयकर (Income Tax) भरावा लागतो. मात्र, विशिष्ट खर्चांवर तुम्हाला यामधून सूट मिळू शकते. एरवी नोकरदार वर्गासाठी वेगवेगळे कर हा पाचवीला पुजलेला विषय असतो. मात्र, बारकाईने विचार केल्यास नोकरदारांना विशिष्ट पद्धतीने खर्च करून यामधूनही पैशांची बचत करता येऊ शकते. कोणते खर्च केल्यास मिळते आयकरातून सूट मिळते, याचा आढावा खालीलप्रमाणे. (know investments for Tax exemptions to save income Tax)

ट्यूशन फी

तुम्ही विवाहित असून तुम्हाला मुलं असतील तर त्यांच्या शिक्षणासाठी खर्च झाल्यास तुम्हाला आयकरातून सूट मिळते. कलम 80 सी अंतर्गत ही सूट दिली जाते.

भविष्य निर्वाह निधी

भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडंट फंड हा नोकरदार वर्गाच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय असतो. नोकरदारांच्या वेतनातून PF साठी जी रक्कम कापली जाते त्यावरही कलम 80 सी अंतर्गत सूट मिळते. यामध्ये तुमच्या EPF आणि PPF खात्याचाही समावेश असतो. याशिवाय, सुकन्या समृद्धी योजना, एनएससी, टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड आणि विशिष्ट मुदत ठेवींमध्ये (Fixed Deposit) गुंतवणूक केल्यास आयकरातून सूट मिळते.

विमा

नोकरदार व्यक्तीने स्वत:च्या कुटुंबाचा विमा उतरवला असेल तर तुम्हाला त्यासाठी आयकरातून सूट मिळते. यामध्ये आरोग्य विम्यापासून ते बच योजनांचा समावेश आहे. जीवन विम्याच्या प्रिमियमसह इतर अनेक पर्यायांचा विचार करता 1.5 लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर माफ असतो.

गृहकर्ज

तुम्ही गृहकर्जाचे हप्ते भरता असाल तर त्यावर तुम्हाला आयकर माफ केला जातो. अशावेळी तुम्हाला होम लोन, एसएसवाय, एनएससी, एससीएससीसी योजनांच्या खर्चासाठीही आयकरातून सूट मिळते.

घरभाड्यावर आयकर माफ

भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांनाही आयकरातून सूट मिळते. जर वर्षाला तुम्ही एक लाखाहून अधिक भाडं भरत असाल तर तुम्हाला त्याची पावती सादर करावी लागते. त्याबरोबर घरमालकाचे पॅनकार्ड देणेही बंधनकारक आहे.

अन्य गुंतवणूक

आयकर वाचवण्यासाठी सेक्शन 80 सी अंतर्गत गुंतवणूक करण्याचा मार्ग सर्रासपणे वापरला जातो. या पर्यायाचा वापर केल्यास एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आयकरातून सूट मिळते.

संबंधित बातम्या:

खाते उघडण्याच्या नियमात RBI कडून बदल; ग्राहकांना होणार मोठा फायदा

New Year ला लागू होणार चेक आणि डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम, RBI ने केली मोठी घोषणा

लग्न करणाऱ्यांना सरकार देत आहे सोनं, लग्नाच्या आधी असं करा अप्लाय

(know investments for Tax exemptions to save income Tax)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.