AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Year ला लागू होणार चेक आणि डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम, RBI ने केली मोठी घोषणा

खरंतर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयच्या नव्या नियमांनुसार आता कॉन्टॅक्टलेस कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

New Year ला लागू होणार चेक आणि डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम, RBI ने केली मोठी घोषणा
पण जास्त वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त कार्ड असले पाहिजे असं लोक सल्ला देतात. अधिक कार्डे असण्याने आपण अधिक सौद्यांचा लाभ घेण्यास सक्षम असाल.
| Edited By: | Updated on: Dec 15, 2020 | 12:50 PM
Share

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्याच्या अखेरला हे वर्ष संपणार असलं तरी नव्या वर्षामध्ये ग्राहकांसाठी अनेक नवे आर्थिक बदल होणार आहे. तुमच्या बँकिंगशी संबंधित काही नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले जाणार आहेत. जर तुम्ही कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. खरंतर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयच्या नव्या नियमांनुसार आता कॉन्टॅक्टलेस कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे. म्हणजेच आता तुम्ही पासवर्डशिवाय अधिक पैशांचा व्यवहार करू शकता. (rbi new rules of contactless debit and credit card know all about banking rules)

कॉन्टॅक्टलेस कार्ड म्हणजे काय?

प्रत्येक बँकेनं सध्या ग्राहकांसाठी कॉन्टॅक्टलेस कार्ड असं एक खास डेबिट आणि क्रेडिट कार्ड दिलं आहे. या कार्डद्वारे तुम्ही पासवर्ड प्रविष्ट केल्याशिवायही काही मर्यादेपर्यंत व्यवहार करू शकता. यासाठी, तुम्हाला फक्त कार्ड मशीनवर द्यावं लागणा आहे. पण अशा परिस्थितीत कार्ड कुठेही हरवणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

काय आहे नवा नियम?

आरबीआयकडून कॉन्टॅक्टलेस कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे. याआधी तुम्ही कॉन्टॅक्टलेस कार्डवरून 2000 रुपयांपर्यंत कॉन्टॅक्टलेस पेमेंट करू शकत होतात, पण आता आरबीआयने हा नियम बदलून ही मर्यादा 5000 रुपये केली आहे. नवीन वर्षात म्हणजेच 1 जानेवारीपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे.

इतकंच नाही तर जानेवारी महिन्यात चेक संदर्भातही काही नियमात बदल करणार आहे. यामध्ये आरबीआय सकारात्मक वेतन प्रणाली लागू करणार आहे. 50 हजाराहून अधिक देय असलेल्या चेकची या प्रणालीद्वारे पुष्टी करावी लागणार आहे. एकदा चेक दिल्यानंतर तो मोबाइल अ‍ॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एसएमएसद्वारे पुष्टीकरण करावा लागेल. त्याची बँकेला रितसर माहिती पुरवावी लागेल. यासाठी तुम्हाला तुमच्या चेकशी संबंधित काही माहिती बँकेला द्यावी लागेल, त्यानंतर तुमचे पुढील व्यवहार केले जातील. (rbi new rules of contactless debit and credit card know all about banking rules)

इतर बातम्या –

‘या’ तीन बड्या कंपनींनी केली भागीदारी, प्रीपेड प्लॅनपासून ते स्मार्टफोनपर्यंत दिली धमाकेदार ऑफर

लग्न करणाऱ्यांना सरकार देत आहे सोनं, लग्नाच्या आधी असं करा अप्लाय

लग्न करणाऱ्यांना सरकार देत आहे सोनं, लग्नाच्या आधी असं करा अप्लाय

(rbi new rules of contactless debit and credit card know all about banking rules)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.