Ravan Dahan : एकीकडे रावणाचं दहन, तर दुसरीकडे पूजा! भारतातील या गावांमध्ये रावणाला मानतात चक्क ‘जावईबापू’
आता रावणं म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येत? उंचच्या उंच पुतळा, त्याला असणारी दहा तोंड आणि मग प्रतिकृती श्रीरामांच्या हस्ते रावणाचे दहन, दसरा दिवशी हे चित्र सगळीकडेच पाहायला मिळते. पण भारतात अशीही काही ठिकाणं आहेत, जिथं रावणाला जाळण्याऐवजी त्याची पूजा केली जाते.

आता रावणं म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येत? उंचच्या उंच पुतळा, त्याला असणारी दहा तोंड आणि मग प्रतिकृती श्रीरामांच्या हस्ते रावणाचे दहन, दसरा दिवशी हे चित्र सगळीकडेच पाहायला मिळते. पण भारतात अशीही काही ठिकाणं आहेत, जिथं रावणाला जाळण्याऐवजी त्याची पूजा केली जाते. एवढंच नाही तर त्याला जावईबापूंचा मानही दिला. म्हणजेच काय एका ठिकाणी रावणाला आपण वाईट आणि क्रूर म्हणून त्याचे दहन करतो तर दुसरीकडे जगाच्या एका कोपऱ्यात त्याला जावईबापूंच्या स्वागताची तयारी केली जाते.
राजस्थानामधील जोधपुरजवळचं मंडोर आणि मध्य प्रदेशातील मंदसौरमधील खानपूरा या भागांमध्ये रावणाशी संबंधित अशी खास परंपरा पाहायला मिळते. त्यामागे रावणाची पत्नी मंदोदरी हिच्याशी जोडलेली स्थानिक मान्यता आहे.
रावणाला जावई मानण्यामागे काय आहे कथा
राजस्थानातील मंडोर हे रावणाचं सासर असल्याची मान्यता आहे. मंदोदरीचा जन्म मंडोरमध्ये झाला असं इथं मानलं जातं.त्यामुळे काही स्थानिक ब्राह्मण समाज रावणाला आपला जावई मानतो.दुसऱ्या दिवशी रावणाचा पुतळा जाळण्याऐवजी काही कुटुंब त्याच्या मृत्यूचा शोक पाळतात आणि त्यासंबंधित धार्मिक विधीही करतात.
मंदसौरमध्ये तर रावणाची पूजा केली जाते
मध्य प्रदेशातील मंदसौरच्या खानपूरा भागातही रावणाला जावई मानलं जातं. मंदोदरीचं माहेर या भागात आहे अशी मान्यता आहे.त्यामुळे नामदेव समाजातील लोक रावणाला जावईराजा मानून त्याची पूजा करतात.
तसेच इथे रावणाची सुमारे 200 वर्षांपूर्वीची आणि साधारण 35 फूट उंच असल्याचं सांगितली जाणारी मूर्ती आहे.या मूर्तीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रावणाच्या डोक्यावर गाढवाचं डोकं दाखवण्यात आलं आहे. स्थानिक मान्यतेनुसार हे त्याची बुद्धी आणि विवेक नष्ट झाल्याचं प्रतीक मानलं जातं.
या भागात रावणाच्या मूर्तीसमोर जाताना काही महिला घुंगट घेतात. जावयाला मान देण्याच्या परंपरेशी ही प्रथा जोडली जाते.दसऱ्याच्या दिवशी इथं रावणाचं दहन करण्याऐवजी पू़जा – अर्चा केली जाते.
टीप: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.
