नेटफ्लिक्सने भारतीय वापरकर्त्यांसाठी लाँच केले खास फीचर, तपशील जाणून घ्या

| Updated on: Sep 02, 2021 | 8:14 AM

सध्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड दोन्हीवर पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, ही सुविधा एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि जिओ सह इंटीग्रेशन सेवेसाठी देखील उपलब्ध आहे.

नेटफ्लिक्सने भारतीय वापरकर्त्यांसाठी लाँच केले खास फीचर, तपशील जाणून घ्या
नेटफ्लिक्सने भारतीय वापरकर्त्यांसाठी लाँच केले खास फीचर
Follow us on

मुंबई : ओटीटी जायंट नेटफ्लिक्स(Netflix)ने आपल्या भारतीय वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर आणले आहे. आता नेटफ्लिक्सचे सदस्य UPI च्या मदतीने मासिक भाडे ऑटो-पे करू शकतात. कंपनीच्या वतीने निवेदन जारी करून असे सांगण्यात आले की, 31 ऑगस्टपासून जर वापरकर्त्याने नेटफ्लिक्सची सदस्यता घेतली तर यूपीआयच्या मदतीने ऑटो-पेचा पर्याय उपलब्ध होईल. (Netflix launches special feature for Indian users, know the details)

सध्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड दोन्हीवर पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, ही सुविधा एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि जिओ सह इंटीग्रेशन सेवेसाठी देखील उपलब्ध आहे. ऑटो-पे वैशिष्ट्य सक्षम करण्यासाठी, प्रथम नेटफ्लिक्स वेबसाईट किंवा अॅपवर जा आणि प्रोफाईल सेक्शन ओपन करा. प्रोफाईल सेक्शनमध्ये, अकाऊंट सेक्शन ओपन करा. येथे क्लिक केल्यावर मॅनेज पेमेंटचा पर्याय येईल. येथून चेंज पेमेंट पद्धत निवडायची आहे. येथे UPI ऑटोपेचा पर्याय देण्यात आला आहे.

आतापर्यंत मर्यादित कार्डांवर होती पेमेंटची सुविधा

सध्या नेटफ्लिक्स पेमेंट फक्त व्हिसा, मास्टरकार्ड, अमेरिकन एक्सप्रेस आणि डायनर्स क्लब क्रेडिट आणि डेबिट कार्डवर उपलब्ध होते. आता ते UPI वर देखील उपलब्ध आहे.

अनेक मालिका येताहेत

कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, येत्या काळात प्रेक्षकांसाठी अनेक प्रकारचा कंटेंट येथे येणार आहे. येत्या काळात कोटा फॅक्टरी, लिटल थिंग्ज, मनी हेस्ट सारख्या मालिका येणार आहेत.

असे मिळेल फ्री सबस्क्रिप्शन

देशातील टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या रिचार्ज प्लॅनवर वेगवेगळ्या ओटीटी सेवा देत आहेत. जर वोडाफोन आयडिया वापरकर्त्यांना नेटफ्लिक्सची सदस्यता विनामूल्य हवी असेल तर ती व्हीआयच्या रेडएक्स प्लॅनवर उपलब्ध आहे. जिओ नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने+ हॉटस्टार व्हीआयपीला त्याच्या सर्व पोस्टपेड प्लॅनसह मोफत सबस्क्रिप्शन देते. (Netflix launches special feature for Indian users, know the details)

इतर बातम्या

आई-वडील, बहीण, आजी, कुणालाच सोडलं नाही, तरुणाने सगळ्यांना संपवलं, कारण ऐकून पोलीसही चक्रावले

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत खबरदारी, उस्मानाबादेत लहान मुलांसाठी राष्ट्रीय पोषण महिना अभियान