धक्कादायक! स्कूटीने कट मारल्याने हाणामारी, लाल रंगाने केला घात, थरारक घटनेने मिराभाईंदर हादरले

शुभमला लाल टीशर्टमध्ये स्कूटीवर पाहिल्यानंतर आरोपी जतीनला हाच तो कट मारणारा स्कूटीवाला असल्याचा गैरसमज झाला. याच गैरसमजातून तोच स्कूटीवाला समजून आरोपीने शुभम भुवडला जबर मारहाण केली.

धक्कादायक! स्कूटीने कट मारल्याने हाणामारी, लाल रंगाने केला घात, थरारक घटनेने मिराभाईंदर हादरले
स्कूटीने कट मारल्याने हाणामारी, लाल रंगाने केला घात, थरारक घटनेने मिराभाईंदर हादरले
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 11:07 PM

भाईंदर : गाडीला कट मारल्याच्या रागातून एका 18 वर्षीय युवकाची 9 जणांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना मीरा भाईंदरमधील काशिमीरा परिसरात घडली आहे. शुभम भुवड (18) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून तो मीरा रोडच्या सिल्वर ऑर्केड इमारतीत राहतो. शुभमने गाडीला कट मारल्याचा गैरसमज होऊन रागाच्या भरात नऊ जणांनी युवकाचा शोध घेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत शुभमचा मृत्यू झाला. याप्रकरणी 9 जणांविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. (Murder of a youth in Mira Bhayander out of anger over hitting a bike)

काय आहे प्रकरण?

आरोपी जतीन उपाध्याय हा आपल्या मोटारसायकलवरून हॉटकेस येथून प्रवास करत होता तेव्हा त्याच्या मोटारसायकलला स्कूटीने धडक दिली. आरोपी जतीन उपाध्याय आणि त्या स्कूटी चालकामध्ये वाद विवाद झाला. यानंतर जतीनने ही बाब घरी जाऊन आपल्या वडिलांना सांगितली. जतीनचे वडील आपल्या मित्रांबरोबर स्कूटी चालकाच्या शोधात मीरा रोडच्या हॉटकेस परिसरात आले. जतीनने सांगितल्याप्रमाणे स्कूटी चालकाने लाल रंगाचा टीशर्ट घातला होता. आणि योगायोगाने मयत शुभव भुवड आपल्या मित्रांसोबत स्कूटीवर लाल रंगाच्या टीशर्टमध्ये उभा होता. शुभमला लाल टीशर्टमध्ये स्कूटीवर पाहिल्यानंतर आरोपी जतीनला हाच तो कट मारणारा स्कूटीवाला असल्याचा गैरसमज झाला. याच गैरसमजातून तोच स्कूटीवाला समजून आरोपीने शुभम भुवडला जबर मारहाण केली. या मारहाणीत निष्पाप शुभम भुवड याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने मीरा-भाईंदर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हत्येप्रकरणी आठ जण अटकेत एक फरार

याप्रकरणी काशिमीरा पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विनोद उपाध्याय (44), आकाश हिरवे (25), कुणाल किनी (33), अमृत उर्फ सनी उपाध्याय (25), वसीम शेख (31), मोहमद राजू इर्षाद शेख (32) व जतीन उपाध्याय (20) आणि सायस मुंढे (20) अशी अटक आरोपींची नावे असून हे सर्व घोडबंदर गावातील रहिवासी आहेत. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर यातील रवी पुजारी हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच ज्या स्कूटीची आरोपी जतीन उपाध्याय याच्या मोटरसायकलला धडक झाली होती तिचाही पोलीस शोध घेत आहे. काशीमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत. (Murder of a youth in Mira Bhayander out of anger over hitting a bike)

इतर बातम्या

आरबीआयने ‘या’ खासगी बँकेला ठोठावला 25 लाखांचा दंड, जाणून घ्या काय आहे कारण

अमेरिकेने अफगाणच नाही तर तालिबान्यांसाठी मागे ‘ही’ धोकादायक शस्त्रास्त्रं आणि युद्ध विमानं मागे सोडलीय

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.