Home Loans : लवकर बांधा स्वप्नातील इमला, रेपो दरानंतर या 10 बँकांचे गृहकर्ज सर्वात स्वस्त

| Updated on: Jun 10, 2023 | 6:10 PM

Home Loans : रेपो दर जाहीर झाल्यापासून या बँकांचे गृहकर्जाचे व्याजदर कमी झाले आहेत.

Home Loans : लवकर बांधा स्वप्नातील इमला, रेपो दरानंतर या 10 बँकांचे गृहकर्ज सर्वात स्वस्त
Follow us on

नवी दिल्ली : आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. जर तुम्ही घर खरेदीच्या तयारीत असाल तर सध्या स्वस्तात गृहकर्ज मिळत आहे. RBI च्या पतधोरण समितीने नुकताचा रेपो दर (Repo Rate) जाहीर केला. हा दर सलग दुसऱ्यांदा जैसे थे ठेवण्यात आला. या निर्णयानंतर नवीन गृहकर्जासाठी काही बँकांनी त्यांचे व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे नवीन घर घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी एक चांगली गोष्ट घडली आहे. पतधोरण समितीने हा रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने या 10 बँकांनी त्यांच्या गृहकर्जाचे व्याजदर (Interest Rate) घटविले आहे.

रिटेल क्रेडिट
गृहकर्ज हे एकप्रकारचे रिटेल क्रेडिट असते. यामध्ये घराचा संपूर्ण खर्च, कर्जदाराला हप्त्याने, EMI द्वारे फेडावे लागते. EMI हा सर्वसाधारणपणे, 20 वर्षांसाठी असतो. 20 वर्षांमध्ये कर्जदाराला दरमहा घराचा हप्ता फेडावा लागतो. त्यामुळे असे कर्ज घेणे ग्राहकाला फायदेशीर ठरते. त्याचे घराचे स्वप्न पूर्ण होते आणि एकदम खर्च करण्याचा ताण येत नाही.

या बँकांमध्ये मिळत आहे स्वस्त गृहकर्ज

हे सुद्धा वाचा
  1. इंडियन बँक – 8.45 ते 9.1 टक्के व्याजदर
  2. HDFC बँक- 8.45 ते 9.85 टक्के व्याजदर
  3. इंडसइंड बँक- 8.5 ते 9.75% व्याजदर
  4. पंजाब नॅशनल बँक- 8.6 ते 9.45 टक्के व्याजदर
  5. बँक ऑफ महाराष्ट्र- 8.6 ते 10.3 टक्के व्याजदर
  6. बँक ऑफ बडोदा- 8.6 टक्के ते 10.5 टक्के व्याज
  7. बँक ऑफ इंडिया- 8.65 टक्के ते 10.6 टक्के व्याज
  8. कर्नाटका बँक- 8.75 टक्के ते 10.43 टक्के व्याज
  9. युनियन बँक ऑफ इंडिया- 8.75 ते 10.5 टक्के व्याज
  10. कोटक महिंद्रा बँक- 8.85 टक्के ते 9.35 टक्के व्याजदर

गृहकर्ज घेताना या गोष्टी ठेवा लक्षात

    • गृहकर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला घराच्या गरजा पण गृहकर्ज घेताना विशेष करुन लक्षात ठेवाव्या लागतील. तुम्हाला खर्चाचे नियोजन करावे लागेल. दर महिन्याला बचत आणि खर्च यांचे नियोजन, सांगड कशी बसते हे तपासूनच गृहकर्ज घेता येईल.
    • कर्ज पूर्व-भरणा केल्याचा फायदा
      30 लाख रुपयांचे कर्ज 20 वर्षांसाठी घेतल्यास पूर्व भरणा रक्कम जमा करण्याचा तुम्हाला मोठा फायदा होईल. समजा 9 टक्के व्याज दराने घेतलेल्या कर्जावर तुम्हाला 27,476 रुपये हप्ता भरावा लागेल. या गृहकर्जावर मासिक 4 हजार रुपायांचा पूर्व भरणा केल्यास व्याजदरातील 2.5 टक्के वाढीचा परिणाम जाणवणार नाही. तुमची व्याजापोटी जास्त जाणारी रक्कम कमी होईल.
    • 11 लाखांची बचत
      30 लाखांवर तुम्हाला 34.78 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. एकूण 64.78 लाख रुपये द्यावे लागतील. पण कर्ज पूर्व भरणा रक्कमेमुळे तुम्हाला मुळ रक्केमसह व्याजापोटी केवळ 53.68 लाख द्यावे लागतील. कर्ज पूर्व रक्कम भरल्याने तुमचे 11.10 लाख रुपये वाचतील.
    • म्युच्युअल फंडात करा गुंतवणूक
      व्याजातून मुक्तीसाठी म्युच्युअल फंड हा चांगला उपाय आहे. घर खरेदीवेळीच काही जण योग्य म्युच्युअल फंड निवडतात आणि त्यात SIP द्वारे गुंतवणूक करतात. त्यामुळे एकाचवेळी खर्च आणि गुंतवणुकीचा कुठलाही ताण येत नाही. समजा तुम्ही 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे आणि 20 वर्षांसाठी त्यावर व्याजदर लक्षात घेता, तुम्हाला बँकेला 1 कोटी रुपये चुकवावे लागतील. हा खर्च काढण्यासाठी तुम्हाला एसआयपीत गुंतवणूक करावी लागेल.