‘या’ सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवा आणि मिळवा घसघशीत फायदा

| Updated on: Jul 21, 2021 | 12:49 PM

जर तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर बाजारात बचत आणि गुंतवणूकीच्या अनेक योजना उपलब्ध आहे. पण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बहुतेक लोक हे सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करतात.

या सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवा आणि मिळवा घसघशीत फायदा
Follow us on

मुंबई : कोरोना काळात प्रत्येकालाच आपल्या भविष्याची चिंता आहे. यामुळे अनेकजण त्यांच्या भविष्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करत आहे. जर तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर बाजारात बचत आणि गुंतवणूकीच्या अनेक योजना उपलब्ध आहे. पण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बहुतेक लोक हे सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अशा लोकांसाठी काही लोकप्रिय सरकारी बचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), पोस्ट ऑफिस बचत खाते, पोस्ट ऑफिस फिक्सड डिपॉझिट, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS), किसान विकास पत्र यांसह विविध योजनांचा समावेश आहे.

या योजनांमध्ये गुंतवणूक करून लोक चांगली बचत करू शकतात. या बचत योजना मुलांचे शिक्षण, लग्न आणि सेवानिवृत्ती इत्यादी विविध प्रकारच्या व्यक्तींना सुविधा देतात. तर कोणती योजना अधिक फायदेशीर आहे, याची माहिती घेऊया.

? सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

या योजनेत कोणीही दरवर्षी किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकतो. या योजनेत वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज दिले जात आहे. या गुंतवणूकदारांनाही दीड लाखांपर्यंत करात सूट मिळते.

? राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)

यात कोणतीही व्यक्ती किमान 1000 रुपये गुंतवणूक करू शकते. तर जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यास कोणतीही मर्यादा नाही. यात गुंतवणूकदारास वार्षिक 6.8 टक्के दराने व्याज मिळतो. तसेच दीड लाखांपर्यंतच्या ठेवींवर कर सूट मिळते.

? पोस्ट ऑफिस बचत खाते

ज्यांना पोस्ट ऑफिस बचत योजनेत गुंतवणूक करायची आहे ते किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. यामध्ये गुंतवणूकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. यामध्ये तुम्हाला वार्षिक 4 टक्के दराने व्याज मिळतो. पोस्ट ऑफिस बचत खात्यातून मिळणारे व्याज करमुक्त आहे.

? पोस्ट ऑफिस फिक्सड डिपॉझिट (Post Office FD)

यामध्ये एखादी व्यक्ती किमान 1000 रुपये गुंतवणूक करू शकते. तर जास्तीत जास्त गुंतवणूकीला मर्यादा नाही. या योजनेतील व्याजदर पहिल्या 3 वर्षांसाठी 5.5 टक्के आणि 5 वर्षांच्या ठेवीच्या कालावधीसाठी 6.7 टक्क्यांने व्याज दिला जातो. तसेच प्राप्तिकर अधिनियम 80 सी अंतर्गत 6 वर्षाच्या ठेवींवर कर कपातची मुभाही दिली जाते.

? पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS)

पोस्ट ऑफिसची ही एक लोकप्रिय योजना आहे. यात तुम्ही खात्यात किमान 1000 आणि जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये जमा करू शकता. तर संयुक्त खात्यात 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. यात तुम्हाला 6.6 टक्के व्याज मिळतो.

? किसान विकास पत्र (KVP)

या योजनेत एखादी व्यक्ती किमान 1000 रुपये गुंतवणूक करू शकते. तर जास्तीत जास्त गुंतवणूकीला मर्यादा नाही. यात वार्षिक 6.9 टक्के दराने व्याज दिला जात आहे. KVP या योजनेत तुम्हाला व्याज आणि मॅच्युरिटीच्या रकमेवरील करात सूट दिली जाते. या योजनेत गुंतविलेली रक्कम 10 वर्ष आणि 4 महिन्यांत (124 महिन्यात) दुप्पट होते.

(Saving And Investment PPF to NSC know which government schemes better and will give high returns)

संबंधित बातम्या : 

पेन्शनधारकांसाठी आनंदाच बातमी; आता दरवर्षी बँकेत खेटे घालावे लागणार नाहीत

पेन्शन फंड ‘आयपीओ’मध्ये गुंतवण्याला मुभा, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

इन्कम टॅक्ससंदर्भात सरकारची मोठी घोषणा, आता हे दोन फॉर्म सादर करण्याची मुदत वाढवली