पेन्शनधारकांसाठी आनंदाच बातमी; आता दरवर्षी बँकेत खेटे घालावे लागणार नाहीत

Pension | नाममात्र शुल्क भरल्यानंतर आता पेन्शनधारक ऑनलाईन डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सेवेसाठी विनंती करु शकतात. यानंतर जवळच्या टपाल कार्यालयातील एक पोस्टमन पेन्शनधारकाच्या घरी जाईल आणि डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.

पेन्शनधारकांसाठी आनंदाच बातमी; आता दरवर्षी बँकेत खेटे घालावे लागणार नाहीत
पेन्शन

मुंबई: दरवर्षी बँकेत जाऊन आपण जिवंत असल्याचे प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करणे, हा पेन्शनधारकांसाठी नेहमीचा रिवाज मानला जातो. मात्र, त्यासाठी पेन्शनधारकांना बँकेत अनेक खेटे मारावे लागतात. एवढे करूनही हे काम यशस्वी होईल, याचीही खात्री नसते.
मात्र, आता पेन्शनधारकांना एक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार पेन्शनधारक आपल्या नजीकच्या टपाल कार्यालयातूनही लाईफ सर्टिफिकेट मिळवू शकतात. याशिवाय, jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळावर जाऊनही पेन्शनधारक हयातीच्या दाखल्यासाठी अर्ज करु शकतात. याशिवाय 7738299899 या क्रमांकावर JPL<Pincode> हा एसएमएस पाठवून तुम्ही नजीकच्या जीवन प्रमाण केंद्राची माहिती मिळवू शकता. याठिकाणी जाऊनही तुम्ही हयात असल्याचा दाखला मिळवू शकता.

घरबसल्या जमा करा हयातीचा दाखला

नाममात्र शुल्क भरल्यानंतर आता पेन्शनधारक ऑनलाईन डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सेवेसाठी विनंती करु शकतात. यानंतर जवळच्या टपाल कार्यालयातील एक पोस्टमन पेन्शनधारकाच्या घरी जाईल आणि डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.

नुकतीच ईपीएफओने पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2021पर्यंत वाढवली होती. याचा फायदा ईपीएफओमध्ये उपस्थित असलेल्या साडेतीन लाख पेन्शनधारकांना होईल, असे दावा त्यांनी केला होता. मात्र, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता आणि वृद्ध लोकांना कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन, ईपीएफओने हा निर्णय घेतला होता.

हयातीचा दाखला सादर करणे का महत्त्वाचे?

प्रत्येक पेन्शनधारकाला दरवर्षी नोव्हेंबरमध्ये एका पेन्शन खाते असलेल्या बँकेत जीवन प्रमाणपत्र अर्थात हयातीचा दाखला सादर करावा लागतो. हयातीचा दाखला पेन्शनधारकाच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. तो वेळेवर जमा न केल्यास पेन्शन थांबवले जाते.

संबंधित बातम्या:

पेन्शनधारकांचं टेन्शन दूर, आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार पेन्शनशी संबंधित माहिती

Pension Alert | पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! आता घरबसल्या घेता येणार ‘या’ सुविधेचा फायदा!

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! पैसे मिळाले नाही किंवा इतर समस्येसाठी ‘इथे’ करा तक्रार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI