अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिवसेना शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेचं तिकीट?
शिवसेना शिंदे गटातून कल्याण आणि ठाणे मतदारसंघासाठी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर केलेत. कल्याणमधून महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली, तर ठाण्यातून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा
काल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपले दोन उमेदवार मुंबईच्या मतदारसंघासाठी जाहीर केलेत. उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर तर दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेचं तिकीट दिलं. त्यानंतर आज शिवसेना शिंदे गटातून कल्याण आणि ठाणे मतदारसंघासाठी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर केलेत. कल्याणमधून महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली, तर ठाण्यातून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून नरेश म्हस्के यांचं नाव घेतलं जातं. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून नरेश म्हस्के एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत आणि आज अखेर त्यांना लोकसभेचं तिकीट शिवसेनेकडून देण्यात आलं आहे.
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत

