AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुम्ही कफन चोर, आता तुमचे घोटाळे…’, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

"तुम्ही गुंतवणूकबाबत अडीच तीन वर्ष रडत होते. माझा सवाल आहे, 25 वर्ष महानगरपालिका तुम्ही बोलाल तशी चालली, तुम्ही नेमकं काय दिलं? ते सांगा. या पंचवीस वर्षांमध्ये तुम्ही मुंबईला काय दिलं?", असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

'तुम्ही कफन चोर, आता तुमचे घोटाळे...', देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
देवेंद्र फडणवीस
| Updated on: May 01, 2024 | 10:21 PM
Share

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा देतो. महाराष्ट्रमध्ये विकास होईल अशी प्रार्थना करतो. काँग्रेसने आपल्यावर अन्याय केला आहे. काँग्रेस हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ माझ्यावर येईल, माझ्या शिवसेना नावाचं दुकान हे मी बंद करून टाकेन. आता बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला काय वाटत असेल? प्रॉपर्टीचे मालक उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असतील. पण विचारांचे मालक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“चुकीच्या गोष्टी आपल्याला सांगतात. काय सांगतात? महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला चालले? खरं म्हणजे महाराष्ट्राची ताकदच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांना माहिती नाही. या महाराष्ट्राची क्षमता काय आहे हे त्यांना माहित आहे का? मी त्यांना सांगतो, उद्धवजी ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं तेव्हा मोदीजींचा आशीर्वाद होता. आम्ही 2015 पासून 2019 पर्यंत सातत्याने परकीय थेट गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम केलं. देशात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा गुंतवणूकमध्ये चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर होता”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘तुम्ही कफन चोर, आता तुमचे घोटाळे…’

“तुम्ही गुंतवणूकबाबत अडीच तीन वर्ष रडत होते. माझा सवाल आहे, 25 वर्ष महानगरपालिका तुम्ही बोलाल तशी चालली, तुम्ही नेमकं काय दिलं? ते सांगा. या पंचवीस वर्षांमध्ये तुम्ही मुंबईला काय दिलं? मोदींचं राज्य आलं. मोदींनी स्टार्टअप पॉलिसी आणली. महाराष्ट्रामध्ये आम्ही स्टार्टअप पॉलिसी आणली. मला असं वाटतं. तुम्ही ज्याच्या सोबत राहता त्यांची सवय तुम्हाला लागली. आता हे अध्यक्ष आहेत का गल्लीचे नेते आहेत?”, असा टोला फडणवीसांनी लगावला. “कोणाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. जोवर चंद्र आहे तोवर मुंबई महाराष्ट्राचीच असणार. तुम्ही कफन चोर आहेत. आता तुमचे घोटाळे बाहेर काढलेत, आगे देखो होता है क्या”, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.