AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL : एका मोसमात सर्वाधिक सिक्स लगावणारे टॉप 5 फलंदाज, ख्रिस गेल कितव्या स्थानी?

Most Sixes in an IPL Season Record : आयपीएल स्पर्धेत एका सिजमध्ये सर्वात जास्त सिक्स ठोकणाऱ्या पहिल्या 5 फलंदाजांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नाही. जाणून घ्या टॉप 5 मध्ये कोण कोण आहेत.

IPL : एका मोसमात सर्वाधिक सिक्स लगावणारे टॉप 5 फलंदाज, ख्रिस गेल कितव्या स्थानी?
Chris Gayle Rcb IPLImage Credit source: TV9 Bharatvarsh
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 18, 2026 | 2:44 AM
Share

आयपीएलच्या 19 व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी अजून 10 पेक्षा अधिक दिवसांचा कालावधी बाकी आहे. यंदा 28 मार्चपासून 19 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे यंदा पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 28 मार्चपासून 16 दिवस 4 डबल हेडरसह एकूण 20 सामने होणार आहेत. मोसमातील पहिल्याच सामन्यात गतविजेता आरसीबी मैदानात उतरणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 2 हात करणार आहे. या 19 व्या हंगामानिमित्ताने या स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या 5 फलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.

युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल पहिल्या स्थानी

आयपीएल स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने 2012 साली आरसीबीकडून खेळताना सर्वाधिक 59 लगावले होते. गेलचा हा विक्रम 14 वर्षांनंतरही कायम आहे.

आंद्रे रसेल

आंद्रे रसेल या यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. रसेलने 2019 साली कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना ही कामगिरी केली होती. रसेलने 52 षटकार लगावले होते. रसेलने 2025 च्या 18 व्या मोसमानंतर निवृत्ती घेतली होती.

ख्रिस गेल

या यादीत तिसऱ्या स्थानीही ख्रिस गेल याहे. गेलने 2013 सालीही षटकारांचं अर्धशतक पूर्ण केलं होतं. गेलने 2013 साली 51 षटकार लगावले होते.

जोस बटलर

इंग्लंड क्रिकेट टीमचा विकेटकीपर बॅट्समन जोस बटलर याने 2022 साली झालेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान जबरदस्त कामगिरी केली होती. बटलरने तेव्हा राजस्थान रॉयल्ससाठी 17 सामन्यांमध्ये 45 षटकार लगावले होते.

ख्रिस गेल

एका मोसमात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या टॉप 5 फलंदाजांच्या यादीत गेल पहिल्या, तिसऱ्या स्थानानंतर पाचव्या स्थानीही विराजमान आहे. गेलने 2021 साली आरसीबीसाठी खेळताना 44 षटकार लगावले होते.

ख्रिस गेल याची आयपीएल कारकीर्द

दरम्यान ख्रिस गेल याने आयपीएल स्पर्धेत निवडक संघांचं प्रतिनिधित्व केलं. गेलने 142 सामन्यांमधील 141 डावांत 148.97 च्या स्ट्राईक रेट आणि 39.72 सरासरीने एकूण 4 हजार 965 धावा केल्या. गेलने या दरम्यान 31 अर्धशतकं आणि 6 शतकं झळकावली आहेत. गेलने आयपीएल कारकीर्दीत 405 चौकार आणि 357 षटकार लगावले.

गेलच्या नावावर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अजूनही कायम आहे. गेलने 175 धावांची विक्रमी खेळी साकारली होती. तसेच गेल आयपीएल कारकीर्दीत 8 वेळा झिरोवर आऊट झाला होता.

Follow Us
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...