AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 LSG : लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असणार?

Lucknow Super Giants IPL 2026 : लखनौ सुपर जायंट्सचं 2022 साली आयपीएलमध्ये पदार्पण झालंय. लखनौचं यंदाचं आयपीएल स्पर्धेतील पाचवं वर्ष आहे. लखनौ पहिल्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत आहे. लखनौ 16 व्या मोसमातील आपला पहिला सामना केव्हा खेळणार? जाणून घ्या.

IPL 2026 LSG : लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असणार?
LSG Rishbah Pant IPL Image Credit source: PTI
| Updated on: Mar 18, 2026 | 12:47 AM
Share

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धतील अंतिम सामना रविवारी 8 मार्च रोजी खेळवण्यात आला. टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करुन सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी 20I वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील भारताचा हा पहिलावहिला आणि एकूण तिसरा टी 20I वर्ल्ड कप ठरला. त्यानंतर 11 मार्च रोजी आयपीएलच्या 19 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. त्यानुसार 28 मार्चपासून या 19 व्या स्पर्धेची रंगत रंगणार आहे.

लखनौ सुपर जायंट्सचा पहिला सामना केव्हा?

लखनौ सुपर जायंट्सला आतापर्यंत एकदाही आयपीएल चॅम्पियन होता आलेलं नाही. त्यामुळे यंदा लखनौ टीमची ही प्रतिक्षा संपवण्याचा प्रयत्न असणार आहे.  विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याच्या नेतृत्वात लखनौ टीम 19 व्या मोसमात खेळणार आहे. लखनौ या मोहिमेतील आपला पहिला सामना हा बुधवारी 1 एप्रिलला खेळणार आहे. लखनौसमोर पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान असणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

टीममध्ये कोण कोण?

आयपीएल 19 व्या मोसमाआधी मिनी ऑक्शन झालं. या मिनी ऑक्शनमधून अनेक संघांनी आपल्या गरजेनुसार खेळाडूंना आपल्या गोटात घेतलं. तर काही खेळाडूंना कायम ठेवलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा तगडा अनुभव असलेली एडन मार्करम आणि मिचेल मार्श ही जोडी लखनौसाठी ओपनिंग करणार आहे. टॉप आणि मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंगची जबाबदारी निकोलस पूरन आणि आयुष बडोनी यांच्यावर असेल. अब्दुल समद फिनीशरच्या भूमिकेत दिसू शकतो. तर मोहम्मद शमी, मयंक यादव आणि आवेश खान या त्रिकुटावर वेगवान गोलंदाजीची धुरा असू शकते.

लखनौच्या पहिल्या 4 सामन्यांचं वेळापत्रक

पहिला सामना, 1 एप्रिल, विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स, लखनौ.

दुसरा सामना, 5 एप्रिल, विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, हैदराबाद.

तिसरा सामना, 9 एप्रिल, विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, इडन गार्डन्स.

चौथा सामना, 12 एप्रिल, विरुद्ध गुजरात टायटन्स, लखनौ.

लखनौ सुपर जायंट्स टीमची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटीकपर), मिचेल मार्श, एडन मार्करम, निकोलस पूरन, आयुष बडोनी, अब्दुल समद, वानिंदु हसारंगा, दिग्वेश राठी, मोहम्मद शमी, मयंक यादव आणि आवेश खान.

इम्पॅक्ट प्लेयर : शाहबाज अहमद, एनरिक नॉर्खिया आणि जोश इंगलिस.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!