AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांनी पुन्हा दाखवली तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला अन्...

मुख्यमंत्र्यांनी पुन्हा दाखवली तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला अन्…

| Updated on: May 01, 2024 | 1:43 PM
Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वेळीच आपला ताफा थांबवला आणि गाडीतून बाहेर पडत अपघात झालेल्या घटनास्थळी पाहणी केली. डंपरचा अपघात झाल्याने रस्त्यात मोठी ऑईल गळती झाल्याचे पाहायला मिळाले. या ऑईलवरून दुचाकीस्वार घसरून मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी तत्काळ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सकाळी मुंबईच्या दिशेने येत असताना त्यांनी आज पुन्हा तत्परता दाखवल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुंबईकडे येताना एका डंपरचा अपघात झाल्याचे शिंदेंच्या नजरेस पडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वेळीच आपला ताफा थांबवला आणि गाडीतून बाहेर पडत अपघात झालेल्या घटनास्थळी पाहणी केली. डंपरचा अपघात झाल्याने रस्त्यात मोठी ऑईल गळती झाल्याचे पाहायला मिळाले. या ऑईलवरून दुचाकीस्वार घसरून मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपला ताफा थांबवून येथील परिस्थिती पाहिली, सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या मदतीने रस्त्यात सांडलेल्या ऑईलवर माती टाकून घेतली. तसेच स्टाफमधील पोलिसांच्या मदतीने दुचाकीस्वाराना एका बाजूने हळू जाण्याचे आवाहन केले. उपस्थित ट्रॅफिक पोलिसाला ही परिस्थिती सांगून त्याला तिथे थांबून वाहनांना नीट पुढे पाठवावे तसेच दुर्घटना झालेला ट्रक लवकरात लवकर हटवून रस्ता मोकळा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. यानंतर ते मुंबईकडे ध्वजवंदन सोहळ्यासाठी रवाना झालेत.

Published on: May 01, 2024 01:43 PM