एसबीआय बँकेचा अलर्ट; सोशल मीडियावर ‘ही’ माहिती शेअर केल्यास फटका बसण्याची शक्यता

| Updated on: Aug 19, 2021 | 11:42 AM

SBI bank | अशा परिस्थितीत ज्या लोकांनी यासाठी नोंदणी केली आहे, त्यांच्या खात्यातून पैसे परस्पर डेबिट केले जातील. यामुळे तुमच्या खात्यातून 12 रुपयेही कापले जाऊ शकतात. असे मानले जाते की, हे पैसे 25 मे ते 31 मेदरम्यान खात्यातून कापले जातात.

एसबीआय बँकेचा अलर्ट; सोशल मीडियावर ही माहिती शेअर केल्यास फटका बसण्याची शक्यता
SBI Alert
Follow us on

मुंबई: भारतीय स्टेट बँकेकडून ग्राहकांना चांगली आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी वेळोवेळी नवनव्या उपाययोजना केल्या जातात. आतादेखील SBI बँकेने सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी एक नवी सूचना जारी केली आहे. त्यानुसार ग्राहकांना बँक खात्यासंदर्भातील खासगी माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

अनेकदा बँकेचे ग्राहक रागाच्या भरात किंवा नकळतपणे सोशल मीडियावर पोस्ट करतात. या माहितीचा हॅकर्सकडून गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे एसबीआय बँकेकडून ग्राहकांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणती आर्थिक पथ्ये पाळाल?

बँकेच्या कारभारासंदर्भात तक्रार करण्यासाठी अनेकजण सोशल मीडियाचा आधार घेतात. यावेळी अनेकजण आपल्या बँक खात्याचा तपशीलही जाहीर करतात. त्यामुळे बँकेकडून ग्राहकांना सावध करताना सांगण्यात आले आहे की, खाते क्रमांक, डेबिट कार्ड नंबर आणि आधार कार्डाचा तपशील सोशल मीडियावर शेअर करु नये. अन्यथा काही गैरप्रकार झाल्यास त्याला बँक जबाबदार राहणार नाही, असेही एसबीआयकडून स्पष्ट करण्यात आले.

बँकेकडून खात्यातून 12 रुपये का कापले जात आहेत?

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे ग्राहकांना त्यांच्या खात्यातून 12 रुपये कापले जाण्याचे कारण सांगितले होते. ग्राहक या प्रकरणी आपली तक्रार कशी नोंदवू शकतात.  ज्या खातेधारकांनी पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत नोंदणी केली आहे, अशा खात्यांमधून 12 रुपये कापले जात आहेत. ही केंद्र सरकारची एक विमा योजना आहे, ज्यामध्ये लोकांना एका वर्षात 12 रुपये जमा केल्यावर अपघाती विमा दिला जात आहे आणि दरवर्षी त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ज्या लोकांनी यासाठी नोंदणी केली आहे, त्यांच्या खात्यातून पैसे परस्पर डेबिट केले जातील. यामुळे तुमच्या खात्यातून 12 रुपयेही कापले जाऊ शकतात. असे मानले जाते की, हे पैसे 25 मे ते 31 मेदरम्यान खात्यातून कापले जातात.

संबंधित बातम्या:

PNB ग्राहकांनो सावधान! बँकेकडून अलर्ट जारी, अन्यथा मोठा तोटा

बँकेचा अलर्ट! तुमच्या खात्यातून 12 रुपये कापले? तर जाणून घ्या असं का घडलं?

सगळ्यात मोठ्या सरकारी बँकेकडून अलर्ट, हा फोन आला तर उचलू नका …