PNB ग्राहकांनो सावधान! बँकेकडून अलर्ट जारी, अन्यथा मोठा तोटा

देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या बँकिंग फसवणुकीबद्दल सतर्क करीत आहेत. एसबीआयनंतर आता पंजाब नॅशनल बँकेने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना बँकिंग घोटाळ्याबाबत अलर्ट जारी केलाय.

PNB ग्राहकांनो सावधान! बँकेकडून अलर्ट जारी, अन्यथा मोठा तोटा
punjab national bank

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँके (PNB-Punjab National Bank) ने आपल्या ग्राहकांना फसवणुकीपासून सावध राहायला सांगून बँकिंग घोटाळ्यांबाबत अलर्ट जारी केलाय. देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या बँकिंग फसवणुकीबद्दल सतर्क करीत आहेत. एसबीआयनंतर आता पंजाब नॅशनल बँकेने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना बँकिंग घोटाळ्याबाबत अलर्ट जारी केलाय.

ट्विटर हँडलवर अनेक प्रकारच्या फसवणुकींचा उल्लेख

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर अनेक प्रकारच्या फसवणुकींचा उल्लेख केलाय. यासह सावधगिरी बाळगण्याचे एक ट्विटही केलेय. बँकेने आपल्या ग्राहकांना सोशल मीडियावर बनावट प्रोफाईलपासून सावध राहण्यास सांगितले. हँडलची पडताळणी केल्याशिवाय कोणतेही बाहेरचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नका किंवा आपली वैयक्तिक माहिती कोणाबरोबरही शेअर करू नका.

बँकेने बनावट कॉलपासून ग्राहकांना केले सतर्क

यापूर्वीही बँकेने बनावट कॉलपासून ग्राहकांना सतर्क केले होते. खरे तर काही लोक बँक कर्मचारी असल्याचे भासवून बनावट कॉल करून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. फोनवरून बँक खात्याविषयी भीती दाखवून त्यांच्या खात्यातून पैसे गायब झाल्याची माहिती मिळते. अशा परिस्थितीत पीएनबीने बँकेच्या ग्राहकांना कोणत्याही जाळ्यात अडकू नये, असा इशारा दिला आहे.

बँक फसवणूक कशी टाळायची?

1 ओटीपी, पिन, सीव्हीव्ही, यूपीआय पिन कोणासोबतही शेअर करू नका
2 बँक खात्यातून दुसऱ्या कोणी पैसे काढल्यानंतर लगेच बँकेला सूचना द्या
3 फोनवर बँकिंग माहिती कधीही सेव्ह करू नका
4 एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डची माहिती शेअर करू नका
5 बँक कधीही कोणतीही माहिती विचारत नाही
6 ऑनलाईन रकमेबाबत सावधगिरी बाळगा
7 चाचणीशिवाय कोणतेही सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका
8 अज्ञात लिंक तपासून घ्या
9 स्पाअवेअरपासून सावध राहा

संबंधित बातम्या

दिग्गज आयटी कंपनी 1 लाख लोकांना नोकर्‍या देणार, उत्पन्नात थेट 41.8 टक्के वाढ

आता मोदी सरकार तुमच्या घराचाही विमा उतरवणार, नुकसानीची भरपाई देणार

Beware of PNB customers! Alert issued by the bank, otherwise huge loss

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI