दिग्गज आयटी कंपनी 1 लाख लोकांना नोकर्‍या देणार, उत्पन्नात थेट 41.8 टक्के वाढ

जूनच्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 41.8 टक्क्यांनी वाढून 51.2 कोटी अमेरिकन डॉलर एवढे (अंदाजे 3,801.7 कोटी) झाले आहे. कंपनीने बुधवारी याबाबत माहिती दिली आहे.

दिग्गज आयटी कंपनी 1 लाख लोकांना नोकर्‍या देणार, उत्पन्नात थेट 41.8 टक्के वाढ
IT Companies
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Vaibhav Desai

Jul 29, 2021 | 3:18 PM

नवी दिल्ली: तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दिग्गज आयटी कंपनी कॉग्निझंट यंदा एक लाख लोकांना नोकऱ्या देणार आहे. जूनच्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 41.8 टक्क्यांनी वाढून 51.2 कोटी अमेरिकन डॉलर एवढे (अंदाजे 3,801.7 कोटी) झाले आहे. कंपनीने बुधवारी याबाबत माहिती दिली आहे. जून 2020 च्या तिमाहीत अमेरिकेतील कंपनीचे एकूण उत्पन्न 36.1 कोटी डॉलर होते.

तिमाहीत कंपनीचा महसूल 14.6 टक्क्यांनी वाढून 4.6 अब्ज डॉलर झाला

कॉग्निझंटने आर्थिक वर्ष 2021 साठीच्या कमाईच्या वाढीचे लक्ष्य 10.2-11.2 टक्क्यांपर्यंत वाढवले. मागील तिमाहीत कंपनीचा महसूल 14.6 टक्क्यांनी वाढून 4.6 अब्ज डॉलर झाला, जो मागील वर्षातील याच कालावधीत 4 अब्ज अमेरिकन डॉलर्स होता. कंपनीच्या अंदाजापेक्षा हा आकडा जास्त आहे.

कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली माहिती

कॉग्निझंट सीईओ ब्रायन हम्फ्रीजच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये आम्ही जवळपास 1 लाख भरती आणि जवळपास 1 लाख सहकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी करतोय. याशिवाय कॉग्निझंट 2021 मध्ये सुमारे 30,000 नवीन पदवीधर आणि 2022 साठी भारतातील नवीन पदवीधरांना 45,000 ऑफर देण्याची अपेक्षा करतो.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांवर भरती

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) मध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एनटीपीसीने कार्यकारी व वरिष्ठ कार्यकारी या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार एनटीपीसीच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. एकूण 22 पदे भरली जाणार आहेत.

लोकसभा सचिवालयात विविध पदांवर भरती

लोकसभा सचिवालयातील विविध पदांवरील भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार डिजिटल हेड आणि वरिष्ठ निर्मात्यांसह बऱ्याच पदांवर भरती केली जाणार आहे. लोकसभा सचिवालयातील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना लोकसभा सचिवालयाच्या अधिकृत संकेतस्थळ loksabhadocs.nic.in ला भेट देणं आवश्यक आहे. लोकसभा सचिवालयाने डिजिटल हेड, वरिष्ठ निर्माता, अँकर / निर्माता, निर्माता, सहाय्यक निर्माता, ग्राफिक्स प्रोमो जीएफएक्स आर्टिस्ट, ग्राफिक्स जीएफएक्स आर्टिस्ट, ग्राफिक्स स्केच आर्टिस्ट, ग्राफिक्स पॅनेल जीएफएक्स ऑपरेटर, प्रोमो एडिटर, सिनीअर व्हिडिओ एडिटर, ज्युनिअर व्हिडिओ एडिटर यांना आमंत्रित केले आहे. संपादक, स्विचर, सिनिअर सोशल मीडिया कंटेंट रायटर, कंटेंट रायटर , सोशल मीडिया हँडल मॅनेजर आणि वेबसाइट व्यवस्थापक या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Sarkari Naukri 2021 : संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ, त्वरा करा

PGCIL Apprentice Recruitment 2021:पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये 1110 पदांवर भरती, आयटीआय ते पदवीधर फ्रेशर्सना मोठी संधी

IT giant cognizant will provide jobs to 1 lakh people, a direct increase of 41.8 per cent in revenue

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें