AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sarkari Naukri 2021 : संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ, त्वरा करा

या भरतीनुसार (MOD Recruitment 2021), ट्रेड्समन मेट आणि एमटीएस यासारख्या पदांवर भरती होईल. रिक्त पदांसाठीचे अर्ज अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत, या (MOD Recruitment 2021) मध्ये अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अधिसूचना व्यवस्थित वाचा.

Sarkari Naukri 2021 : संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ, त्वरा करा
चाणक्य नीतीमध्ये आचार्य म्हणतात की ज्या देशात तुमचा आदर नाही, जिथे तुम्हाला रोजगार मिळत नाही, जिथे तुमचे मित्र नाहीत आणि जिथे तुम्हाला कोणतेही ज्ञान नाही अशा देशात राहू नका.
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 20, 2021 | 6:29 PM
Share

Government Jobs For 10th, 12th Pass नवी दिल्ली : सरकारी नोकर्‍या शोधणार्‍या तरुणांसाठी संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी उपलब्ध आहे. संरक्षण मंत्रालयांतर्गत विविध डिपोमध्ये एकूण 458 पदे भरती केली जातील. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. अधिसूचनेनुसार, ही भरती संरक्षण मंत्रालयाच्या सी / ओ 56 एपीओच्या 41 फील्ड एम्युनिशन डेपोमध्ये केली जाईल. दहावी आणि बारावी उत्तीर्ण लोकांसाठी ही एक उत्तम नोकरीची संधी आहे. (Job opportunities in the Ministry of Defense; Apply early, close to the application deadline)

संरक्षण मंत्रालय(Ministry Of Defence Job) अंतर्गत येणाऱ्या या डेपोमध्ये भरतीसाठी 10 ते 16 जुलै 2021 या कालावधीत रोजगार वृत्तात जाहिरात प्रसिद्ध केली गेली. या भरतीनुसार (MOD Recruitment 2021), ट्रेड्समन मेट आणि एमटीएस यासारख्या पदांवर भरती होईल. रिक्त पदांसाठीचे अर्ज अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत, या (MOD Recruitment 2021) मध्ये अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अधिसूचना व्यवस्थित वाचा. अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार अर्ज करा.

वयोमर्यादा

या सर्व पदांच्या उमेदवारांचे वय अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला 18 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, शासनाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत शिथिल करण्याची तरतूद आहे, अधिक माहितीसाठी भरती अधिसूचना पहा. सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

असा अर्ज करा

इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या भरती पोर्टल, indianarmy.nic.in वर प्रदान केलेल्या अर्जाद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. विनंती केलेल्या कागदपत्रांसह संपूर्ण भरलेला अर्ज जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन जमा करावा लागेल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रकाशित होण्याच्या तारखेपासून दिवसांच्या आत म्हणजेच 30 जुलै 2021 निश्चित केली गेली आहे. कमांडंट, 41 फिल्ड एम्युनिशन डेपो, पिन – 909741 या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. यामध्ये केवळ सामान्य पोस्ट किंवा नोंदणीकृत पोस्ट किंवा स्पीड पोस्टद्वारे अर्ज सादर करता येतील. (Job opportunities in the Ministry of Defense; Apply early, close to the application deadline)

इतर बातम्या

कसं सुरु होतं संपूर्ण रॅकेट, व्हाट्सअ‍ॅप चॅटमधून झाला खुलासा, राज कुंद्राच्या साथीदाराला अटक

ठाण्यात छमछम बंद, 15 लेडीजबार सील; महापालिकेची मोठी कारवाई

Follow Us
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप