कसं सुरु होतं संपूर्ण रॅकेट, व्हाट्सअ‍ॅप चॅटमधून झाला खुलासा, राज कुंद्राच्या साथीदाराला अटक

राज कुंद्राचा प्रदीप बक्षी नावाचा जोडीदार ज्याच्याबरोबर राज कुंद्राची व्हॉट्सअॅप चॅट समोर आली आहे. या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून उघडकीस आले आहे की, राज कुंद्रा स्वत: अश्लील चित्रपटांच्या निर्मितीपासून ते त्यांच्या वितरणापर्यंतच्या सर्व व्यवसायांवर नजर ठेवत असे.

कसं सुरु होतं संपूर्ण रॅकेट, व्हाट्सअ‍ॅप चॅटमधून झाला खुलासा, राज कुंद्राच्या साथीदाराला अटक
राज कुंद्रा
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 6:19 PM

मुंबई : अश्लील चित्रपट प्रकरणात शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारी रात्री उशिरा राज कुंद्राला अटक करण्यात आली. अटकेपूर्वी राज कुंद्राची मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशी केली होती, त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले.

यानंतर त्याला थेट मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयात आणून मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता, काल (19 जुलै) रात्री राज कुंद्राच्या घराची झडती घेण्यात आली. त्यांच्यावर आयपीसी कलम 420 आणि 67 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात जामीनाची तरतूद नाही.

व्हाट्सअ‍ॅप चॅटमधून खुलासा

राज कुंद्राचा प्रदीप बक्षी नावाचा जोडीदार ज्याच्याबरोबर राज कुंद्राची व्हॉट्सअॅप चॅट समोर आली आहे. या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून उघडकीस आले आहे की, राज कुंद्रा स्वत: अश्लील चित्रपटांच्या निर्मितीपासून ते त्यांच्या वितरणापर्यंतच्या सर्व व्यवसायांवर नजर ठेवत असे.

त्या चॅटमध्ये राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी प्रदीप बक्षी यांच्यामधील संभाषणामध्ये राज कुंद्रा प्रदीप बक्षीशी दर आठवड्याला असा चित्रपट रिलीज करण्याविषयी बोलत होता. फेब्रुवारी महिन्यात वेब सीरीज बनवण्याच्या नावाखाली अश्लील चित्रपटांच्या शूटिंगच्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला होता. त्यावेळी 5 जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हाच हे चॅट रिट्रीव्ह केले होते.

अश्लील चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रींविषयी चर्चा

या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये कुंद्राने लंडनमधील त्याची कंपनी चालवणाऱ्या प्रदीप बक्षीशी संभाषण केले होते, जे लंडनमधून वेगवेगळ्या अ‍ॅप्सवर अश्लीलतेचे व्हिडीओ अपलोड करायचे. या संभाषणामध्ये दैनंदिन उत्पन्न वाढणार्‍या ग्राहकांचा उल्लेखही आहे. राज कुंद्रा या ग्रुपमध्ये दररोज सर्व तपशील घेत असत की, किती नफा झाला, किती तोटा होतो आणि व्यवसाय कसा वाढवता येतो, यावर चर्चा करत. दिवसाच्या कमाईचा हिशेबही ठेवला जात असे.

राज कुंद्राशी संबंधित या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 5 सदस्य होते. यामध्ये त्या सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत की, कोणती नायिका कधी बोलावायची, काय करायचे. त्यांच्याशी व्यवहार कसे करावे. त्यांना काय म्हणाचे आणि शूटसाठी त्यांना केव्हा कॉल करायचा. पोर्नोग्राफीमध्ये काम करणार्‍या अभिनेत्रीच्या पैशांच्या व्यवहाराचा पूर्ण उल्लेखही या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये नोंदवला गेला आहे. राज कुंद्रा या चॅटमध्ये मार्केटींगची रणनीती, वाढती विक्री, मॉडेल्सचे पेमेंट आणि इतर सौद्यांविषयी बोलले जात असे. या व्हॉट्सअॅप ग्रुपचे नाव “एच” अकाउंट्स होते. राज कुंद्राच्या अटकेमध्ये हे व्हॉट्सअ‍ॅप चॅट मुख्य कारण ठरले.

एजंट्सच्या मार्फत अश्लील सिनेमे पुरवण्याचा व्यवसाय

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

यापूर्वी अटक केलेला आरोपी आणि राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत याच्या चौकशीत सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे राज कुंद्राला सोमवारी समन्स बजावून बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर त्यालाही अटक करण्यात आली. याच प्रकरणातील तपासा दरम्यान गुन्हे शाखेला हेही समजले, की केनरिन प्रॉडक्शन हाऊस देशभरातील वेगवेगळ्या एजंट्सच्या मार्फत अश्लील सिनेमे पुरवण्याचा व्यवसाय करत आहे आणि त्यासाठी फंडिंग करत आहे.

(Raj Kundra And Pradeep Bakshi what’s app chat revealed)

हेही वाचा :

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती, प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक, कारण काय?

अभिनेत्री गहना वशिष्ठच्या चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत, शिल्पा शेट्टीचा नवरा अश्लील चित्रपट प्रकरणात कसा सापडला?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.