AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीबाबत कोर्टाची मोठी अपडेट; करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

Sunjay Kapur Property Dispute: करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून खूप मोठा वाद सुरू आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयाने परस्पर समजुतीने हे प्रकरण सोडवण्यास सांगितलं आहे.

संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीबाबत कोर्टाची मोठी अपडेट; करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
संजय कपूरचं कुटुंबImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 11, 2026 | 9:37 AM
Share

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूर याच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून कोर्टात वाद सुरू आहे. संजय कपूरचं गेल्या वर्षी लंडनमध्ये पोलो खेळताना निधन झालं होतं. तेव्हापासून त्याच्या संपत्तीवरून कुटुंबीयांमध्ये वाद सुरू आहे. संजयच्या संपत्तीवरून आई राणी कपूर, पूर्व पत्नी करिश्मा कपूर, करिश्मा-संजयची दोन मुलं आणि तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर आमने-सामने आहेत. याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने या संपूर्ण वादाला अत्यंत दु:खद परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे कुटुंबाला परस्पर सहमतीने तोडगा काढण्याचा आणि मध्यस्थीचा गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

संजय हा खूप मोठा उद्योगपती होता. तो सोना कॉमस्टार या कंपनीचा तो अध्यक्ष होता. जून महिन्यात पोलो खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचं निधन झालं होतं. संजयची संपत्ती तब्बल 30 हजार कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. 2016 मध्ये करिश्मा कपूरला घटस्फोट दिल्यानंतर संजयने 2017 मध्ये मॉडेल प्रिया सचदेवशी लग्न केलं होतं. संजयच्या निधनानंतर करिश्माने तिच्या दोन मुलांच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेतून प्रिया सचदेववर काही आरोप करण्यात आले होते. संजय कपूरच्या मालमत्तेचा वाद दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला तेव्हा प्रियाने दावा केला की संजयची संपूर्ण वैयक्तिक संपत्ती 2025 मध्ये केलेल्या मृत्यूपत्रात तिला हस्तांतरित करण्यात आली होती. करिश्माच्या वतीने तिच्या दोन्ही मुलांनी आणि संजयची आई राणी कपूर यांनी या मृत्यूपत्राला न्यायालयात आव्हान देत ते फसवं असल्याचं म्हटलं होतं.

दिल्ली उच्च न्यायालयात या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांनी सांगितलं की, या वादामुळे संपूर्ण कुटुंबाला मानसिक आणि भावनिक नुकसान सहन करावं लागत आहे. देवाने कुटुंबाला अशी संपत्ती दिली आहे जी अंतर्गत कलहात वाया घालवण्यापेक्षा सर्वांनी सामंजस्याने वाटून घ्यावी. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने प्रिया कपूरचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाला सांगितलं की, त्यांच्या क्लायंटने म्हणजेच प्रिया सचदेवने मध्यस्थीसाठी पुढील पावलं उचलावीत.

न्यायालयाने सर्व पक्षकारांना पुढे असंही सांगितलं की प्रिया आता एकटी आहे आणि तिला तिच्या मुलांचीही काळजी घ्यायची आहे. कोर्टाने सर्व पक्षकारांच्या वकिलांना निर्देश दिले की ते त्यांनी आपापल्या क्लायंटशी बोलून त्यांना मध्यस्थीसाठी तयार करावं. संजय कपूरची आई राणी कपूरने जवळपास 28 हजार कोटी रुपयांचा अंतरिम डिविडेंड प्रिया कपूरला देण्यावर स्थगिती देण्याची विनंती केली आहे. तर प्रियाने याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे. या दोन्ही याचिकांवर नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 मार्च रोजी होईल.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ