AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती, प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक, कारण काय?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज कुंद्रा यांचं नाव एका खटल्यात पुढे आलं आहे. त्यामुळे कुंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र त्यांना आता अटक करण्यात आली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती, प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक, कारण काय?
उद्योगपती राज कुंद्रा, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 11:04 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर राज कुंद्रा यांच्या अटकेची माहिती समोर येत आहे.  एका प्रकरणात राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं होतं. आज दिवसभर त्यांची चौकशी झाली. त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे.  (industrialist Raj Kundra is arrested by the Mumbai Police Crime Branch)

एका अश्लील चित्रपटाच्या चित्रिकरणावरुन राज कुंद्रा यांना ही अटक केली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये या प्रकरणी एक तक्रार दाखल करण्यात आला होता. एका अभिनेत्रीलाही पोलिसांनी अटक केली होती. चित्रपट बनवणाऱ्या अनेक लोकांची चौकशी करण्यात आली होती. आज कुंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. सुमारे 7 ते 8 तास चौकशी झाल्यानंतर संध्याकाळी अटक करण्यात आली आहे. उद्या त्यांना न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. राज कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे राज कुंद्रा यांना अटक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

राज कुंद्रा यांच्या विरोधात यापूर्वीही तक्रार

यापूर्वी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध एका उद्योगपतीने मार्च 2020 मध्ये तक्रार केली होती. मुंबईतील एक नॉन-रेसिडेन्शिअल इंडियन उद्योगपती सचिन जे. जोशी यांनी पोलिसात तक्रारीत केली होती. हे प्रकरण सोन्याचा व्यापार करणारी कंपनी ‘सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’शी (एसजीपीएल) संबंधित होतं. कुंद्रा हे यापूर्वी या कंपनीचे माजी संचालक होते. मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये जोशी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा, गणपती चौधरी, मोहम्मद सैफीसह एसजीपीएलच्या इतर अधिकाऱ्यांवर फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.

द्योगपती सचिन जोशी आणि राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी यांच्यात 2014 रोजी देवाण-घेवाणीवरुन वाद झाला होता. 15 दिवसांपूर्वी जोशी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती समोर येत आहे.

“मला लालच देऊन माझी फसवणूक केली आहे. 2014 रोजी सुरु करण्यात आलेल्या एसजीपीएलची सतयुग गोल्ड स्कीमद्वारे फसवणूक केली आहे”, असा आरोप मुंबईतील एक नॉन-रेसिडेन्शिअल इंडियन उद्योगपती सचिन जे. जोशी यांनी केला होता.

“सतयुग गोल्ड स्कीमद्वारे विकलेली पाच वर्षाच्या स्वर्ण योजनेद्वारे डिस्काऊंट देत खरेदीदारांना सतयुग गोल्ड कार्ड दिले. पाच वर्षानंतर एक निश्चित प्रमाणात किंमत देणार असल्याचेही सांगितले होते”, अशी माहिती तक्रारदार जोशी यांनी दिली होती.

दरम्यान, यापूर्वीही शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा अनेक वादात सापडले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची यांच्यासोबत राज कुंद्राचे आर्थिक संबंध असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला आहे. ईडीने यासंबंधी कुंद्रा यांना नोटीसही दिली होती. पण कुंद्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते.

इतर बातम्या :

‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ म्हणत पुणे शहरात देवेंद्र फडणवीसांचे बॅनर्स, अमोल मिटकरींसह काही पुणेकरांकडून मात्र ट्रोलिंग

The Kapil Sharma Show | प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘कप्पू की टोली’ पुन्हा तयार! ‘कपिल शर्मा’ शोमध्ये नव्या चेहऱ्याची एंट्री!

industrialist Raj Kundra is Arrested by the Mumbai Police Crime Branch

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.