AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Kundra | राज कुंद्राच्या वेब सीरीजसाठी नग्न ऑडिशनची मागणी, अभिनेत्रीचा आरोप

फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई क्राईम ब्रँचने अश्लील चित्रपटांसंदर्भात एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यात राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत आणि मॉडेल-अभिनेत्री गहना वशिष्ठ यांच्यासह अकरा जणांना अटक करण्यात आली होती.

Raj Kundra | राज कुंद्राच्या वेब सीरीजसाठी नग्न ऑडिशनची मागणी, अभिनेत्रीचा आरोप
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक, अभिनेत्री सागरिका सुमनचे आरोप
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 20, 2021 | 11:25 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जवळपास तीन तास चौकशी केल्यानंतर क्राईम ब्रँचने रात्री 11 वाजता त्याला मुंबईत बेड्या ठोकल्या. त्यानंतर अभिनेत्री सागरिका सोना सुमन (Sagarika Shona Suman) हिने आपल्यालाही वाईट अनुभव आल्याचं सांगितलं आहे.

काय आहे आरोप

“मी सागरिका सोना सुमन. हे अश्लील चित्रपटांचं एक मोठं रॅकेट आहे. यामध्ये बड्या लोकांचा सहभाग आहे. राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात मलाही एक वाईट अनुभव आला होता. ऑगस्ट 2020 मध्ये मला एका वेब सीरीजमध्ये काम करण्याची ऑफर आली. मी होकार दिल्यावर राज कुंद्राच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामत यांचा मला फोन आला. माझी ऑनलाईन ऑडिशन घेण्याचं ठरलं. मी व्हिडीओ कॉल जॉईन केल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली. मला धक्का बसला, आणि मी नकार देत कॉल बंद केला, असा दावा अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने केला आहे.

या व्हिडीओ कॉलमध्ये तिघे जण होते. त्यापैकी एकाचा चेहरा झाकलेला होता, तर एक बहुतेक राज कुंद्रा होता. जर तो यात सहभागी असेल, त्याला अटक करुन या रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणीही सागरिकाने केली आहे.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

गहना वशिष्ठच्या अटकेनंतर रॅकेटचा पर्दाफाश

फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई क्राईम ब्रँचने अश्लील चित्रपटांसंदर्भात एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यात राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत आणि मॉडेल-अभिनेत्री गहना वशिष्ठ यांच्यासह अकरा जणांना अटक करण्यात आली होती. चौकशी दरम्यान समोर आले की आंतरराष्ट्रीय स्तरावर गहना वशिष्ठ आणि उमेश कामत याला केनरिन प्रॉडक्शन हाऊसमधून अश्लील चित्रपट बनवण्याचे काम मिळत असे. मेलद्वारे तयार केलेल्या अश्लील फिल्म केनरिन प्रॉडक्शन हाऊसला पाठवल्या जात. अश्लील चित्रपट निर्मितीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे पैसे थेट यांच्या बँक अकाऊंटमध्ये पाठवले जायचे. सोशल मीडिया अ‍ॅप हॉटस्पॉटवर हे अश्लील चित्रपट अपलोड केले जात होते.

यापूर्वी अटक केलेला आरोपी आणि राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत याच्या चौकशीत सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे राज कुंद्राला सोमवारी समन्स बजावून बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर त्यालाही अटक करण्यात आली. याच प्रकरणातील तपासा दरम्यान गुन्हे शाखेला हेही समजले, की केनरिन प्रॉडक्शन हाऊस देशभरातील वेगवेगळ्या एजंट्सच्या मार्फत अश्लील सिनेमे पुरवण्याचा व्यवसाय करत आहे आणि त्यासाठी फंडिंग करत आहे.

संबंधित बातम्या

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती, प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक, कारण काय?

अभिनेत्री गहना वशिष्ठच्या चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत, शिल्पा शेट्टीचा नवरा अश्लील चित्रपट प्रकरणात कसा सापडला?

(Actress Sagarika Shona Suman Claims Raj Kundra Offered Her Web Series Objectionable demands in audition)

Follow Us
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान