AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uday Samant: महायुतीत जुंपली! उदय सामंतांचा मंत्री गणेश नाईकांवर जोरदार पलटवार; म्हणाले, ‘माझे नेते एकनाथ शिंदे…’

जिल्ह्यामध्ये एखादा प्रकल्प येत असेल तर त्याची माहिती प्रथम पालकमंत्र्यांना मिळाली पाहिजे, असं म्हणत मंत्री गणेश नाईक यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला होता. आता उदय सामंत यांच्या या टिकेला उदय सामंत यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. 

Uday Samant: महायुतीत जुंपली! उदय सामंतांचा मंत्री गणेश नाईकांवर जोरदार पलटवार; म्हणाले, 'माझे नेते एकनाथ शिंदे...'
| Updated on: Nov 14, 2026 | 3:08 PM
Share

Uday Samant Vs Ganesh Naik:  पालघरच्या भादवे- उसरणी या प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पावरुन वनमंत्री गणेश नाईक आणि  मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये जोरदार जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यामध्ये एखादा प्रकल्प येत असेल तर त्याची माहिती प्रथम पालकमंत्र्यांना मिळाली पाहिजे, असं म्हणत मंत्री गणेश नाईक यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला होता. आता उदय सामंत यांच्या या टिकेला उदय सामंत यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे.

काय म्हणाले उदय सामंत? 

“गणेश नाईक यांच्याकडे वनविभाग आहे. आता वनविभागात काय चाललंय? हे मला सांगावे असे अपेक्षित नाही. तसं माझ्या विभागात मी काय करावं हे मी मुख्यमंत्र्‍यांना आहे, माझे नेते एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना आहे. नाहीतर प्रत्येक मंत्रालयात निर्णय घेताना प्रत्येक मंत्र्‍याला सांगावे लागेल. तशी काही व्यवस्था मंत्रालयात नाही. त्यापुढे जाऊन मी सांगितले की ते ज्येष्ठ आहेत त्यांचं देवेंद्र फडणवीस साहेब ऐकू शकतात. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना सांगावे,” असं मंत्री उदय सामंत यावेळी म्हणालेत.

तसेच  “माझ्य्या विभागात काय चाललंय? हे मंत्र्यांने ठरवावे माझ्या विभागातील प्रशासकीय टीमने ठरवावे. या प्रकल्पाला काही ठिकाणी विरोध आहे त्यामुळे प्रकल्पावर प्रश्न निर्माण झाला आहे. मी अनुभवाने वयानेही त्यांच्यापेक्षा लहान आहे. त्यांनी या शंका मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून दूर करावेत,” असा टोलाही त्यांनी मंत्री गणेश नाईख यांना लगावला.

दोन्ही शिवसेना एकत्र येणार? 

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबत महत्त्वाचे विधान केले होते. यावरुनही मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. “ओमराजे काय बोलले हे महत्त्वाचं नाही, मात्र  आमच्या पक्षाची एक सिस्टिम आहे. आमच्या पक्षात जिल्हा परिषद,आमदारकी , खासदारकी याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही एकनाथ शिंदेंकडे आहेत. त्यामुळे पक्षाच्या धोरणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदेंकडेआहे, उदय सामंतकडे नाही,” असं ते म्हणाले.

Follow Us
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!
विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; नेमकं काय..
Sanjay Raut On NCP Merger : विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; असं काय म्हणाले?
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट,
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट, अजित गव्हाणेंचा गंभीर आरोप!
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसे नेत्यांकडून जय्यत तयारी...
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसेच्या सुरेखा परब यांच्याकडून जय्यत तयारी, जोरदार बॅनरबाजी
मुंबईनंतर पुण्यातही मफलरवाला पोस्टर; अजितदादांचा अपघात की घातपात?
Ajit Pawar Poster Controversy : मुंबईनंतर पुण्यातही मफलरवाला पोस्टर; अजितदादांचा अपघात की घातपात? राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं....
Ajit Pawar : अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं; 16 नोव्हेंबरला रोहित पवार मोठा खुलासा करणार?