AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tinnu Anand: 5 बरगड्या मोडल्या, फुफ्फुसालाही गंभीर दुखापत; टीनू आनंद यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Tinnu Anand: ज्येष्ठ अभिनेते टीनू आनंद यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे बेडरेस्टचा सल्ला दिला आहे. त्यांच्या पाच बरगड्या मोडल्या होत्या.

Tinnu Anand: 5 बरगड्या मोडल्या, फुफ्फुसालाही गंभीर दुखापत; टीनू आनंद यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट
टिनू आनंदImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 14, 2026 | 3:12 PM
Share

Tinnu Anand: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक टीनू आनंद यांच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या टीनू आनंद यांना अखेर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्बल 14 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर ते घरी परतले आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. वयाच्या 81 व्या वर्षी झालेल्या या अपघातामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.

टीनू आनंद यांना नेमकं काय झालं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार, टीनू आनंद यांचा त्यांच्या राहत्या घरी अपघात झाला होता. रात्रीच्या वेळी ते घरात फिरत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. विशेष म्हणजे, रात्री घरात पुरेसा प्रकाश नसल्यामुळे त्यांना काहीच दिसलं नाही आणि हा अपघात घडला. सुरुवातीला दुखापतीचं गांभीर्य लक्षात आलं नव्हतं. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांना फ्रॅक्चर झाल्याचं समजलं. त्यानंतर त्यांच्या मुलीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या पाच बरगड्या मोडल्याचं समोर आलं. यातील एका मोडलेल्या बरगडीमुळे त्यांच्या फुफ्फुसालाही गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Tinnu Anand (@tinnuah)

टीनू आनंद यांनी दिला हेल्थ अपडेट

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर टीनू आनंद यांनी स्वतःच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. पीटीआयशी बोलताना त्यांनी सांगितले की, 14 दिवसांनंतर ते घरी परतले असून आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा बरी आहे. डॉक्टरांनी त्यांना सध्या घरीच विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. पुढील 7 ते 10 दिवस ते घरातच आराम करणार असून त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. सध्या त्यांना चालणं, उठणं, बसणं यांसारख्या साध्या हालचाली करतानाही त्रास होत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरीच फिजिओथेरपी घेत आहेत. पूर्णपणे बरे होईपर्यंत बाहेर न पडण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

टीनू आनंद यांनी चित्रपटसृष्टीत अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून मोठं योगदान दिलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘कालिया’, ‘शहंशाह’, ‘मैं आजाद हूं’ आणि ‘मेजर साब’ यांसारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. तर ‘अग्निपथ’, ‘घातक’, ‘दबंग’, ‘गजनी’, ‘सालार’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. सध्या त्यांच्या काही चित्रपटांचे काम प्रलंबित असल्याची माहिती आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पुढील महिन्यात दोन दाक्षिणात्य चित्रपटांचे काम सुरू करण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, सध्या त्यांचे संपूर्ण लक्ष प्रकृती सुधारण्यावर आहे.

Follow Us
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!
विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; नेमकं काय..
Sanjay Raut On NCP Merger : विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; असं काय म्हणाले?
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट,
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट, अजित गव्हाणेंचा गंभीर आरोप!
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसे नेत्यांकडून जय्यत तयारी...
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसेच्या सुरेखा परब यांच्याकडून जय्यत तयारी, जोरदार बॅनरबाजी
मुंबईनंतर पुण्यातही मफलरवाला पोस्टर; अजितदादांचा अपघात की घातपात?
Ajit Pawar Poster Controversy : मुंबईनंतर पुण्यातही मफलरवाला पोस्टर; अजितदादांचा अपघात की घातपात? राजकीय वर्तुळात खळबळ