स्पेशल रिपोर्ट : राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याने मनसे ‘मिशन 90’ गाठणार? पुणे महापालिकेत कुणाची किती ताकद?

राज ठाकरे यांनी नाशिकपाठोपाठ पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पुणे महापालिका निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं निश्चित करण्यात आलंय.

स्पेशल रिपोर्ट : राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याने मनसे 'मिशन 90' गाठणार? पुणे महापालिकेत कुणाची किती ताकद?
पुणे महापालिकेसाठी मनसेची तयारी

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र पुणे महापालिका निवडणुकीत पहायला मिळणार का? असं विचारलं जात असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मिशन 90 आखण्यात आल्याचं कळतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकपाठोपाठ पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पुणे महापालिका निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं निश्चित करण्यात आलंय. (Raj Thackeray’s visit to Pune, MNS’s ‘mission 90’ for Pune Municipal Corporation election)

पुण्यातील मनसेची ताकद पाहायची झाल्यास 2007 मध्ये मनसेचे 8 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर 2012 मध्ये मनसेनं चांगलीच भरारी मारल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 29 नगरसेवकांसह पुणे महापालिकेत मनसे एक ताकदवर पक्ष बनला. मात्र, पुढे मनसेची ताकद क्षीण झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या पुणे महापालिकेत मनसेचे 2 नगरसेवक आहेत. असं असलं तरी 2022 म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व ताकदीने उतरणार असल्याचं आता दिसून येत आहे.

45 जागा निवडून येणारच, मनसेचा दावा

दरम्यान, प्रभार रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात. मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता. आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील 90 जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच 45 जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी पक्ष बांधणी आवश्यक आहे. अशावेळी राज ठाकरे यांचा पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे.

राज ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार पुण्यातील कार्यकारिणीतील पदांमध्ये बदल केला जाणार आहे. प्रभाग अध्यक्ष, उपाध्यक्ष ही पदं रद्द करुन शाखाध्यक्ष आणि शाखा उपाध्यक्ष यांची नियुक्ती करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसंच निवडणूक प्रचारात मनसेचं मुख्य टार्गेट हे सत्ताधारी भाजप असणार आहे.

मनसेचं आपत्ती व्यवस्थापन पथक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील पहिल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची (Disaster Management Squad) घोषणा केली आहे. पूर, इमारत दुर्घटना यासारख्या संकटकाळात हे आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाच्या मदतीला येईल. मनसेच्या प्रशिक्षित पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांचा पथकात समावेश असेल.

कसे असेल मनसेचे आपत्ती व्यवस्थापन पथक?

– मनसेने पुण्यात राज्यातील पहिले आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन केले
– आपत्ती व्यवस्थापन पथकात 50 मुला-मुलींचा समावेश असेल
– शहरातील पूरस्थिती, इमारत दुर्घटना यासारख्या संकटांच्या वेळी मनसेचे आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाची मदत करणार
– आपत्ती व्यवस्थापन पथकातील मुला-मुलींना मनसे प्रशिक्षण देणार

पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपैकी प्रशिक्षित पुरुष आणि महिला यांचा पथकात समावेश असेल. पुणे शहरात सतत नैसर्गिक आपत्ती कोसळत असते. त्यासाठी 50 जणांचे प्रशिक्षित मनसे रेस्क्यू पथक कार्यरत असेल. पुणे शहरात वारंवार आपत्ती ओढवत असते. त्या पार्श्वभूमीवर विशेष आपत्ती पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

राज ठाकरेंची भन्नाट ऑफर

राज ठाकरे यांचा आज पुणे दौऱ्यातील दुसरा दिवस आहे. पुणे पालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी म्हणून त्यांनी शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली आहे. चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईल, असं राज यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे. सध्या पुण्यता मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.

पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप – 99
राष्ट्रवादी – 42
काँग्रेस – 10
सेना – 10
मनसे – 2
एमआयएम – 1
एकूण जागा – 164

संबंधित बातम्या :

Raj Thackeray | राज ठाकरेंनी पुण्यात घोषणा केलेले मनसेचे आपत्ती व्यवस्थापन पथक कसे असेल?

Raj Thackeray | चांगलं काम करा, तुमच्या घरी जेवायला येतो; राज ठाकरेंची शाखाध्यक्षांना भन्नाट ऑफर

Raj Thackeray’s visit to Pune, MNS’s ‘mission 90’ for Pune Municipal Corporation election

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI