Raj Thackeray | चांगलं काम करा, तुमच्या घरी जेवायला येतो; राज ठाकरेंची शाखाध्यक्षांना भन्नाट ऑफर

पुणे पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदारसंघांचा आढावा घेतानाच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं कामही राज ठाकरे यांनी सुरू केलं आहे. (Raj Thackeray)

Raj Thackeray | चांगलं काम करा, तुमच्या घरी जेवायला येतो; राज ठाकरेंची शाखाध्यक्षांना भन्नाट ऑफर
राज ठाकरे

पुणे: पुणे पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदारसंघांचा आढावा घेतानाच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं कामही राज ठाकरे यांनी सुरू केलं आहे. त्यातच त्यांनी कार्यकर्त्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. चांगलं काम करा. तुमच्या घरी जेवायला येतो, अशी ऑफरच राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांना दिली आहे. त्यामुळे राज यांच्या या ऑफरची सध्या मनसेत जोरदार चर्चा सुरू आहे. (Raj Thackeray’s meeting with party workers in pune)

नाशिकचा दौरा आटोपल्यानंतर राज ठाकरे काल पुण्यात आले. आज त्यांचा पुण्यातील दुसरा दिवस आहे. आज ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. कालही त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मतदारसंघ निहाय माहिती घेतली. स्थानिक प्रश्न आणि पुण्यातील राजकीय वातावरण, जनतेचा कल याविषयीचीही माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. पुणे पालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी म्हणून त्यांनी शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली. चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईल, असं राज यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे. सध्या पुण्यता मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.

नवचैतन्य संचारेल?

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखाध्यक्षांनी जोमाने काम करावे यासाठीच राज यांनी ही ऑफर दिली आहे. तसेच पुण्यात संघटनात्मक बांधणी चांगली व्हावी, हा हेतूही या ऑफरमागे असल्याचं सूत्रांनी सांगितलं. राज यांनी ही ऑफर दिल्याने मनसेत नवचैतन्य संचारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनविसेच्या बैठकीकडेही लक्ष

मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद सोडून आदित्य शिरोडकर यांनी गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून मनविसेला सावरण्याचं मोठं आव्हान राज ठाकरेंसमोर असेल.

मिशन पुणे

नाशिक दौरा आटपून राज ठाकरे सोमवारपासून पुणे दौऱ्यावर आले आहेत. नाशिकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत राज ठाकरे यांची झालेली 15 मिनिटांची चर्चा सर्वत्र उत्सुकतेचा विषय ठरली होती. राज ठाकरे नाशिकमध्ये आहेत, मीही नाशिकमध्येच आहे. आमच्या वेळा जुळल्या तर राज यांच्यासोबत एक कप चहा घ्यायला काहीच हरकत नाही, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं, त्यानंतर लगेचच या दोन्ही नेत्यांच्या वेळाही जुळल्याचं दिसलं. (Raj Thackeray’s meeting with party workers in pune)

 

संबंधित बातम्या:

Raj Thackeray | राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांसोबत बैठका, मनविसेच्या कार्यकर्त्यांशीही संवाद

राज ठाकरेंच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास, ते लिंक पाठवणार आहेत, भेटीनंतर चंद्रकांतदादांनी गप्पांचे डिटेल्स सांगितले

मुंबईत मनसेला धक्का, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश

(Raj Thackeray’s meeting with party workers in pune)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI