टाटा ग्रूपच्या अवघ्या चार रुपयांच्या ‘या’ समभागाने गुंतवणुकदारांना केले मालामाल

| Updated on: Aug 01, 2021 | 12:30 PM

Share Market | गेल्यावर्षी 9 जून रोजी टाटा टेलीसर्विसेसच्या समभागाची किंमत अवघी 3.82 रुपये इतकी होती. मात्र, आज वर्षभरानंतर याच समभागाची किंमत 46.95 रुपये इतकी झाली आहे.

टाटा ग्रूपच्या अवघ्या चार रुपयांच्या या समभागाने गुंतवणुकदारांना केले मालामाल
गुंतवणुकदार मालामाल
Follow us on

मुंबई: कोरोनाच्या काळात नोकऱ्या आणि उद्योगधंद्याचे तीनतेरा वाजले असले तरी शेअर बाजार मात्र चांगलाच तेजीत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात तर शेअर बाजाराने अनेक गुंतवणुकदारांना अक्षरश: मालामाल केले. गेल्या वर्षभरात अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सनी चांगली कामगिरी केली आहे.

यापैकी एक समभाग म्हणजे टाटा टेलीसर्विसेस (महाराष्ट्र) लिमिटेड (Tata Teleservices Ltd). या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना तब्बल 1129 टक्के रिटर्न्स दिले आहेत. वर्षभरापूर्वी तुम्ही टाटा टेलीसर्विसेस कंपनीच्या समभागांमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आता त्याचे मूल्य जवळपास 12.29 लाख रुपये इतके झाले आहे.

गेल्यावर्षी 9 जून रोजी टाटा टेलीसर्विसेसच्या समभागाची किंमत अवघी 3.82 रुपये इतकी होती. मात्र, आज वर्षभरानंतर याच समभागाची किंमत 46.95 रुपये इतकी झाली आहे. आगामी काळात या समभागाची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. या चांगल्या कामगिरीमुळे टाटा टेलीसर्विसेसचे भांडवली बाजारातील एकूण मूल्य 9178 कोटी रुपये इतके झाले आहे.

गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.

एका सत्रात गुडलक इंडियाच्या शेअर्सची किंमत इतकी वाढली की, 10 टक्क्यांवर अप्पर सर्किट लागले. गेल्या पाच सत्रांमध्ये या समभागाची किंमत तब्बल 31 टक्क्यांनी वाढली आहे.

संबंधित बातम्या:

20 वर्षांचे कर्ज 10 वर्षांत कसे फेडायचे? जाणून घ्या ‘स्मार्ट सेव्हिंग्स’मधून पैशांची बचत करण्याची सोपी माहिती

Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स

एका वर्षात या बँकिंग इक्विटी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, सरासरी 50 टक्क्यांहून अधिक उत्पन्न