Rupees : 2000 रुपयांच्या नोटा होणार जमा, एवढ्या रुपयाची नवीन नोट दिसणार..

| Updated on: Dec 24, 2022 | 9:43 PM

Rupees : नवीन वर्षांत एवढ्या रुपयाची नवीन नोट बाजारात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे..

Rupees : 2000 रुपयांच्या नोटा होणार जमा, एवढ्या रुपयाची नवीन नोट दिसणार..
नवीन नोट येणार कोणती?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : हे वर्ष संपायला एक आठवडा उरला आहे. नवीन वर्षाची, 2023 ची लवकरच सुरुवात होत आहे. देशभरातील सर्वसामान्यांच्या आयुष्यात 1 जानेवारी 2023 पासून काही तरी बदल होणार आहे. नवीन वर्षांत काही नियम (Rules Change) बदलणार आहेत. यामध्ये बँकेच्या लॉकरसंबंधीचे नियम आहेत. क्रेडिट कार्ड संबंधीचे नियम आहेत. वाहनांच्या नोंदणीसंबंधीचे नियम, मोबाईलच्या IMEI संबंधीच्या नियमांचा समावेश आहे. दरम्यान नवीन वर्षांत 1000 रुपयांच्या नोटा (New Currency Note) येतील आणि 2000 रुपयांची जुनी नोट (Old Currency Note) बंद होईल, असा दावा करण्यात येत आहे.

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावर 1 जानेवारी 2023 पासून 1000 रुपयांची नोट बाजारात येईल आणि 2000 रुपयांची नोट बंद होईल, असा दावा करण्यात येत आहे. पण केंद्र सरकारने या अनुषंगाने कुठलीही अधिसूचना जाहीर केलेली नाही. पत्र सूचना कार्यालायने (PIB Fact Check) याविषयीच्या दाव्याचा पडताळा केला आहे.

हे सुद्धा वाचा

या व्हिडिओने देशभरात धुमाकूळ घातला आहे. दाव्यानुसार, केंद्रीय रिझर्व्ह बँक नवीन वर्षात म्हणजे 1 जानेवारी 2023 रोजी पासून एक हजार रुपयांची नवीन नोट बाजारात दाखल करणार आहे. ही नोट हिरव्या रंगाची आहे. नोटबंदीच्या काळात एक हजाराची नोट बंद झाली होती. त्यानंतर ती पुन्हा सुरु करण्याचे वृत्त अनेकदा समोर आले आहे.

PIB Fact Check ने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओचा आधार घेत, हा दावा खोडून काढला आहे. सोशल मीडियावरील हा दावा खोडसाळ असून पूर्णतः बोगस असल्याचा दावा पत्र सूचना कार्यालयाने केला आहे. यासंबंधीचे ट्विटही त्यांनी केले आहे.

पीआयबीनुसार, 1 जानेवारी 2023 पासून नवीन वर्षांत 1000 रुपयांच्या नोटा (New Currency Note) येतील आणि 2000 रुपयांची जुनी नोट (Old Currency Note) बंद होण्याचे वृत्त निराधार आहे. केंद्र सरकार अथवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

2000 रुपयांची नोट सुरु असून, ती बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. PIB Fact Check ने असे खोडसाळ संदेश फॉरवर्ड न करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. तसेच असा मॅसेजवर विश्वास न ठेवण्यास सांगितले आहे.